वंचितच्या उमेदवाराला चाबकाचे फटके देऊन माफी मागायला लावली कारण…
The underdog candidate was flogged and made to apologize because...
केज मतदारसंघात अपक्ष उमेदवाराला वंचितने पाठिंबा जाहीर केला होता, तोच उमेदवार आता भाजपाच्या वळचणीला गेल्याने कार्यकर्ते संतापले आहेत. यातून त्यांनी उमेदवाराला काळे फासत चाबकाचे फटके देऊन माफीही मागायला लावल्याचा प्रकार घडला आहे. (There has been a case where the candidate has been flogged with a black cord and made to apologize.)
वंचितचे जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे हे उमेदवार सचिन चव्हाण यांना काळे फासत असताना व मारहाण करतानाची एक चित्रफित समाजमाध्यमातून प्रसारित झाली. शैलेश कांबळे यांनी सचिन चव्हाण यांनी भाजपच्या एका स्थानिक नेत्याकडून पाच लाख रुपये घेतल्याचा आरोप करून निवडणुकीसाठी पैसे घेणे हा पक्षाचा आणि पक्षाचे नेते ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांचा अपमान असल्याचे माध्यमांना सांगितले. आपण काळे फासून सचिन चव्हाण यांना मारहाण केली असून तो गुन्हा आपल्याला कबूल आहे. दोन दिवसांपूर्वी सचिन चव्हाण यांची स्थानिक भाजप नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर पाच लाखांचा व्यवहार झाल्याची खात्रीपूर्वक माहिती कळली. त्यानंतरच काळे फासण्यात आल्याचे कांबळे म्हणाले. स्वत: सचिन चव्हाण यांनीही एका चित्रफितीत वंचितच्या काही पदाधिकाऱ्यांसमोरच आपल्याला पैशांची गरज होती, त्यामुळे आपण काही मित्रांकडे रक्कमेची मागणी केल्याचे सांगताना दोघांकडून प्रत्येकी ५० हजार घेतल्याची कबुली दिली.
भाजपाला पाठिंबा का दिला अशी विचारणा करत जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे यांनी चव्हाण यांना काळे फासले व नंतर चाबकाचे फटके लगावले. यानंतर चव्हाण यांचा व्हिडीओ काढत त्यांना माफी देखील मागायला लावली आहे.