परभणीत कडकडीत बंद,गंगाखेड,जिंतुरला हजारो मराठा बांधवांनी काढला मोर्चा

0 50

परभणी,दि.22(प्रतिनिधी) : मराठा समाजाला सरसगट ओबीसी प्रवर्गातून आरक्षण द्यावे या मागणीसाठी संघर्षयोध्दा मनोज जरांगे पाटील यांनी 16 सप्टेंबरपासून आंतरवाली सराटीत सुरु केलेल्या उपोषणाच्या समर्थनार्थ व राज्य सरकारने या प्रश्‍नावर चालविलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने रविवारी (दि.22) परभणी जिल्हा बंदचे आवाहन केले होते.या बंदला सर्व दूर मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

परभणीत शाळा-महाविद्यालयांना सुट्टी

आज परभणीत जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ व शासनाच्या निषेधार्थ सकल मराठा समाज लोकमान्यतेचा कडकडीत बंद दिसून आला. आज सकाळपासूनच अनेक शाळा महाविद्यालय तर अनेक महाविद्यालयांना नंतर सुट्टी देण्यात आली. सर्व दुकाने बंद करून कडकडीत बंद ठेवण्यात आला आज वसमत रोड, छत्रपती  शिवाजी महाराज चौक, गंगाखेड रोड, जिंतूर रोड सर्व दुकाने बंद दिसून आली तसेच अनेक नागरिकांनी यात स्वयंपुरतीने उत्सुकतेने सहभाग नोंदवला.

 गंगाखेडला हजारो मराठा बांधवांनी काढला मोर्चा
मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असल्यामुळे त्यांनी अंतरवाली सराटी येथे सुरू केलेल्या उपोषणाला पाठिंबा दर्शवित या उपोषणाकडे शासनाने तात्काळ लक्ष द्यावे अशी मागणी करत मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ अखंड मराठा समाज समन्वय समितीचे श्रीकांत भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार २३ सप्टेंबर रोजी गंगाखेड बंदची हाक देत सकाळी ११ वाजता भगवती चौक येथून डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. मराठा समाज बांधवांच्या वतीने केलेल्या आवाहनाला व्यापारी बांधवांनी उत्सफूर्त प्रतिसाद देत कडकडीत बंद पाळला. भगवती चौक येथून निघालेल्या मराठा समाज बांधवांनी दिलकश चौक, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या जागेवर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या मांडत मनोगत व्यक्त केले. श्रीकांत भोसले यांच्या मनोगतानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मोर्चाची सांगता करण्यात आली. त्यानंतर राजमाता अहिल्यादेवी होळकर चौकात बंजारा समाज बांधवांच्या तिज महोत्सवात सहभागी बंजारा समाज बांधवांना खिचडीचे वाटप करण्यात आले. यावेळी मराठा समाज बांधव हजारोंच्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!