आत्महत्या रोखण्यासाठी : मनन, चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज-डॉ. जगदीश नाईक

0 124

परभणी,दि 01 ः
आज आपण आपसा आपसा मधील संवाद हरवत चाललो आहोत, त्याची परिणीती मनातला ताण वाढत जाऊन निराशे चे रूप घेत आहे. तसेच आजचा युवक व्यसनाकडे वळत आहे.. आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक, शैक्षणिक ताणातूम आलेल्या एककीपणा मुळे आत्महत्या सारखे टोकाचे पाऊल उचलले जात आहे.आत्महत्या रोखण्यासाठी : मनन, चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन मानसोपचार तज्ञ डॉ. जगदीश नाईक यांनी केले.
महातपुरी ता.गंगाखेड येथील शिव जयंती सप्ताहा निमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. जगदीश नाईक बोलत होते.पुढे पोलताना डॉ.नाईक म्हणाले, आत्महत्या रोखण्यासाठी आपण अश्या व्यक्तीला मदतीचा हात देण्याची गरज आहे असेही ते पुढे बोलताना म्हणाले. आत्महत्या चे विचार मनात येणाऱ्या व्यक्तीने हे विचार कुणा जवळ तरी बोलून दाखवावेत , त्यासाठी वैद्यकीय मदत घेण्यासाठी घाबरू नये असेही त्यांनी सांगितले
डॉ. ज्ञानोबा खंटिंग यांनी स्वतःच्या अनुभव सांगून कितीही खडतर प्रसंग आले तरी त्यां प्रसंगाना जिद्धिने सामोरे जायला हवे. आत्महत्या ही पळवाट आहे असे सांगितले.
आत्महत्या का घडतात ह्या मागची सविस्तर कारण मिमांसा शिक्षक वालवटे सर व शिक्षक मोटे सर यांनी आपल्या मनोगतात स्पस्ट केली.. शैक्षणिक अपयश, व्यसन , प्रेमभंग, कर्ज, लग्न न होने, नापिकी, मोबाईलचा अतिरेक, हनि ट्रॅप यारख्या आमिषाला बळी पडून अनेक तरुण आपले जीवन संपवत असल्याचे त्यांनी सांगितले.
मनसशास्त्र चे प्रा. माणिक लिंगायत यांनी आत्महत्या करणारी व्यक्ती ओळखता येऊ शकते, अश्या व्यक्तीच्या वागण्यात , बोलण्यात , भावनेत झालेले बदल जर लक्ष्यात घेतले तर अश्या व्यक्ती ने आत्महत्या करण्या अगोदर काही इंडिकेशन दिलेले असतात ते गांभीर्या ने घेतले तर एक आत्महत्या वाचवता येऊन शकते असे सांगितले. तर् शिक्षक मानकर सर यांनी आत्महत्या ची आकडे वारी ची माहिती देऊन चिंता व्यक्त केली व यासाठी सर्वोपत्तरी प्रयत्न होण्याची गरज बोलून दाखवली.
या प्रसंगी व्यासपीठावर गावचे प्रतिष्ठित व्यक्ती सरपंच प्रल्हाद शिंदे, उपसरपंच किरण चाफळे माजी उप सरपंच उत्तम आणा मुलगीर व सर्व ग्राम पंचायात् सदस्य, चेयरमन प्रकाश शिंदे , पोलीस पाटील विजय चाफळे , युसूफ खान , सखाराम बोबडे मजि सैनिक् प्रभु चाफळे, माजी सैनिक त्रिम्बक् दुमने, डॉ. दिघोळे, व डॉ. कदम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालण बापूराव मुळे यांनी केले तर कार्यक्रमचे आयोजन अमजद शेख यांनी केले. तर आभार प्रदर्शन मानकर यांनी मांडले… कार्यक्रम यशस्वी कारण्यासाठी वसंत शिंदे , सचिन सुरवसे, रायाजी सुरनार , शंकर खजे आदिनी परिश्रम घेतले.

error: Content is protected !!