स्थानिक देखाव्यात त्रिशूळ प्रथम,तर विसर्जन मिरवणुकीत सुवर्णकार, महावीर गणेश मंडळ प्रथम
केदार पाथरकर
पूर्णा/दिनांक 19 सप्टेंबर शिवसेना उध्दव ठाकरे गटाच्या वतीने श्री गणेश फेस्टिवल स्पर्धेतील स्थानिक देखाव्यात त्रिशूळ गणेश मंडळाने प्रथम तर विसर्जन मिरवणुकीतील सामाजिक देखाव्यासाठी सुवर्णकार व धार्मिक देखाव्यासाठी महावीर गणेश मंडळाला पारितोषक मिळाले.
महालक्ष्मी सजावट स्पर्धेसाठी उत्कृष्ट सजावट सौ. जयश्री आनंद डहाळे, सौ.अर्चना गंगाप्रसाद पिंपरणे, सौ.वर्षा विश्वनाथ सोनटक्के, सौ.सुश्मिता वाकडे,सौ.प्रगती हेमंत कुलकर्णी या महिलांना पैठणी साडी देऊन गौरविण्यात आले. लहान कलाकारांचा सत्कार करण्यात आला.त्यात प्रियांशु रौत्रे,आशुतोष कानगुले, समर कदम यांचा सहभाग आहे.उत्कृष्ट बाल गणेश मंडळांचा पुरस्कार श्री गणराज गणेश मंडळ यांना देण्यात आला त्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज याचा देखावा सादर केला होता.
स्थानिक सजावट साठी प्रथम पारितोषक त्रिशूळ गणेश मंडळ द्वितीय पारितोषिक श्री शिवाजी गणेश मंडळ, तृतीय पारितोषिक श्री दत्त गणेश मंडळ यांना देण्यात आले.
श्री विसर्जन मिरवणुकीत उत्कृष्ट धार्मिक प्रथम पारितोषक श्री महावीर गणेश मंडळ, द्वितीय पारितोषिक श्री ओम गणेश मंडळ, तृतीय श्री अष्टविनायक गणेश मंडळ यांना देण्यात आले.
विसर्जन मिरवणुकीतील सामाजिक देखाव्या साठी प्रथम पारितोषक श्री सुवर्णकार गणेश मंडळ, द्वितीय पारितोषिक श्री त्रिशूळ गणेश मंडळ,तृतीय पारितोषिक श्री महर्षी वाल्मिकी गणेश मंडळ, शांतता व सुव्यवस्था साठी श्री एकता गणेश मंडळ, उत्कृष्ट गणेश मूर्ती साठी श्री शिवनेरी गणेश मंडळ यांना पारितोषिक देण्यात आले.
छत्रपती श्री शिवाजी महाराज चौक येथे आयोजित पारितोषिक वितरण सोहळ्यास खासदार संजय जाधव, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख विशाल कदम, व्यापारी सावरमल अग्रवाल,संतोष एकलारे,दशरथ भोसले, काशिनाथ काळबांडे, साहेब कदम, शामराव कदम, नितीन उर्फ बंटी कदम, शंकर गलांडे, परिक्षीत सवणेकर, विकास वैजवाडे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे संयोजन शिवसेना शहर प्रमुख संकेत उर्फ मुंजा कदम यांनी केले होते.
या वेळी जगदीश जोगदंड, अमृतराज कदम, प्रा. गोविंद कदम, ॲड. राजेश भालेराव, सचिन उर्फ पप्पू कदम, रवी जयस्वाल, शिवा पाथरकर, रवी कदम, सुमित कोत्तावार, राम बोबडे, आनंद अजमेरा, जयप्रकाश मोदानी, भगवान सोळुंके, दत्ता कदम, विनायक कदम, शरद कदम, अजय कदम आदी उपस्थित होते.