सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयाला राज्यस्तरीय कायाकल्प पुरस्कार

0 64

सेलू ( प्रतिनिधी )
रुग्णालयातील आरोग्य सेवेची बळकटी करून दर्जा वाढवण्यासाठी केंद्रसरकारने ही कायाकल्प योजना सुरू केली आहे .
या योजनेत परभणी जिल्ह्यातील सेलूच्या उपजिल्हारुग्णालयाने जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे ८३.४३% गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला आहे .
या योजनेअंतर्गत रुग्णालयाच्या परिसरातील स्वछता ,सेवेची गुणवत्ता वाढवण्याच्या उद्देशाने आरोग्य संस्थेची अंतर बाह्य स्वछता ,निर्जंतुकीकरण ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था ,सांडपाण्याची विल्हेवाट ,आरोग्य सेवेतील सुविधा आदी निकषांचे विविध स्तरावरून मूल्यांकन व परीक्षण करून हे पुरस्कार देण्यात येतात .
सन २०२३-२४ मधील या पुरस्कारासाठी सेलूच्या उपजिल्हारुग्णालयाची निवड करण्यात आली आहे .यामध्ये एक लाख रुपयांचा हा कायाकल्प पुरस्कार आहे.
सेलू उपजिल्हारुग्णालयातील आरोग्य सेवेचे बळकटीकरण करण्यासाठी उपजिल्हारुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जनार्धन गोळेगावकर यांच्या सह वैद्यकीय अधिकारी , आरोग्य संस्थेतील अधिकारी व कर्मचारी यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ नागेश लखमावार ,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ कल्याण कदम यांच्या मार्गदर्शनाखाली अथक परिश्रम घेतले .
सन २०२३-२४ या वर्षात ८८६२८ बाह्य रुग्णांवर ओपीडी मध्ये उपचार करण्यात आले .तर १२५९३ अंतररुग्णांवर आई पी डी मध्ये योग्य ते उपचार करण्यात आले .एकूण ८६८ प्रसूती करण्यात आल्या व त्यापैकी ६०५ नॉर्मल व २६३ सीझर करण्यात आल्या .वर्षभरात एकूण ५२५८८ जनांची रक्त तपासणी करण्यात आली .तर ४०४ गरोदर मातांची सोनोग्राफी करण्यात आली .६५२ मोठ्या तर १५८७ लहान शस्त्रक्रिया वर्षभरात करण्यात आल्या .
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ६८ लहान बालकांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या व हृदय रोग तपासणी देखील करण्यात आली .
उपजिल्हारुग्णालयाने मिळवलेल्या या यशाबद्दल रुग्णालयातील जनसेवा मदत केंद्राचे मार्गदर्शक जी प चे माजी सभापती अशोकराव काकडे यांनी उपजिल्हारुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ जनार्धन गोळेगावकर ,डॉ आलेश बुरेवार ,डॉ मुजमिल पठाण ,इंचार्ज सिस्टर मंजुषा घरमोडे ,स्वप्नाली पवार ,अश्विनी गोरमाळी ,राधा काशीद ,फार्मसी ऑफिसर ,साधना दळे ,जीवन भदरगे ,दिपक बहोत ,भारत गायकवाड ,विकास चौहान ,मगर यांचा पुष्पगूछ देऊन सत्कार केला .व शुभेच्छा दिल्या .
यावेळी अशोक उफाडे ,सचिन धापसे ,चेतन निकम ,राजेश पडुळे ,प्रवीण जाधव ,सुनील धापसे ,ललित बोबडे ,अनिकेत शिंदे ,अशोक जगताप ,गोविंद गायकवाड ,राजू सोळंके ,गणेश काचेवार ,संभाजी धापसे ,हरिभाऊ पडुळे व आशिष जाधव यांची देखील प्रमुख उपस्थिती होती .

error: Content is protected !!