दुधनाकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा…आमदार डॉ.राहुल पाटलांचा पाठपुरावा ठरला यशस्वी
परभणी : परभणी विधानसभा मतदार संघातील ग्रामीण भागातील नागरीकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभुमीवर नागरीकांचा तसेच जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यासाठी निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यात यावे अशी मागणी लाभक्षेत्र विकास व प्राधिकरन मुख्य अभियंता व जिल्हाधिकारी यांच्याकडे आ. डॉ. राहूल पाटील यांनी केली होती. या मागणीनुसार दोन दिवसात सांडव्याद्वारे नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार याबाबतचे पत्र तहसिलदार डॉ.संदिप राजापुरे यांनी काढले आहे.त्यामुळे आमदार डॉ.पाटील यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.
परभणी तालुक्यामध्ये ग्रामीण भागात नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. दुधना नदी पात्र कोरडे पडल्यामुळे नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला आहे. दुधना नदीच्या लाभ क्षेत्रातील मालेगाव, दुधनगाव, कुंभारी, झरी, मांडवा, जवळा खुर्द, जलालपूर, पिंपळा, नांदापूर, सनपुरी, करडगाव, हिंगला, धारणगाव, साटला, समसापूर, मांगणगाव, धार, मटकराळा, देवठाणा, मुरुंबा, पिंपळगाव, साबा, आलापुर पांढरी, नांदगाव, राहटी या गावातील पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर बनला असून जनावरांनाही पिण्यासाठी पाणी उपलब्ध नाही. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी दुधना प्रकल्पातून नदीपत्रात पाणी सोडावे अशी मागणी परभणी शिवसेना ठाकरे गटाचे आ.डॉ. पाटील यांनी काही दिवसापूर्वी लाभक्षेत्र विकास व प्राधिकरण मुख्य अभियंता तसेच जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. या मागणीला लोअर दुधना पाटबंधारे विभागाने सकारात्मक प्रतिसाद दिला असुन जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रस्ताव येताच तातडीने पाणी सोडण्याची कार्यवाही करु असे अश्वासन मुख्य अभियत्यांनी दिले होते. तसेच परभणी तालुक्यातील पाणी टंचाई निवारणासाठी प्रस्ताव पाठविण्याबाबत जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याशी आ.डॉ.पाटील यांनी चर्चा केली असता लवकरच प्रस्ताव पाठवु असे अश्वासन जिल्हाधिकारी गावडे यांनी दिले आहे.त्यानुसार जिल्हा प्रशासनाचा प्रस्ताव लोअर दुधना पाटबंधारे विभागाकडे दिला आहे.त्यानुसार सांडव्याद्वारे दोन दिवसात नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार आहे.त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.याबाबतचे पत्र दिनांक 14 मे रोजी तहसिलदार डॉ.संदिप राजापुरे यांनी काढले आहे.त्यानुसार नदीपात्रात कोणीही जाऊ नये,जनावरे,वस्तु,शेती साहित्य सुरक्षीत हलवावे आशा सुचना दिल्या आहेत. पाणी सोडण्यात येणार असल्याने नदीकाठच्या ग्रामस्थांनी आमदार डॉ.राहुल पाटील यांचे आभार मानले आहेत.