बाळापूर वाडी ला जोडणारा पूल त्वरित करण्याची विजय पाटील बोढारे यांची मागणी
आखाडा बाळापूर, प्रतिनिधी – आखाडा बाळापूर मधील वाडीत जाणारा पूल उंच करून त्वरित बांधण्यात यावा अशी मागणी शिवसेना युवा नेते तथा माजी उपसरपंच विजय पाटील बोढारे यांनी केली . बाळापूर वाडीत जाण्यासाठी नाला ओलांडून जावे लागते त्या नाल्यावरील असलेला पूल अरुंद व अतिशय कमी उंचीचा असल्या मुळे पाऊस पडला की नाल्याला पूर येतो व वाडी वस्तीचा संपर्क तुटतो शिवाय अरुंद पुलामुळे वाडीतील नागरिकांच्या घरात ही पाणी शिरते ही समस्या सोडविण्यासाठी पुलाची उंची वाढून पूल त्वरित बांसण्यात यावा अशी मागणी विजय पाटील बोढारे यांनी निवेदनाद्वारे कार्यकारी अभियंता यांचे कडे केली.
मागील तीन चार दिवसात झालेल्या जोरदार पावसामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत् देण्याची मागणी सुद्धा त्यांनी तहसीलदार कळमनुरी यांचे कडे केली.बाळापूर वाडीला जोडणारा पूल हा पिंपरी (खु) कडे जाणाऱ्या रस्त्यावर असून सदरील रोड चे काम हे सन 2017 साली प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून झाले त्या अंदाज पत्रकात पुलाची उंची व रुंदी कमी असल्यामुळे संबंधित गुत्तेदाराने काम झाले नसल्याची माहिती प्राप्त झाली .सदरील सर्व बाबी लक्षात घेऊन नागरिकांची नेहमीचीच झालेली समस्या व त्रास सोडविण्यासाठी त्वरित अमलबाजवणी करण्याचे ही विजय पाटील बोढारे यांनी निवेदनात नमूद केले .