हे काय घडलं…. आमदारांनी मारल्या मंत्रालयाच्या जाळीवर उड्या

0 365

राज्याच्या राजकारणात धक्कादायक बातमी आली आहे. सत्ताधारी पक्षात असलेले आणि विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी सीताराम झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी मंत्रालयाच्या संरक्षक जाळीवर उड्या मारल्या. उड्या मारण्यापूर्वी झिरवळ यांच्यासह काही आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. ही भेट निष्फळ ठरल्यानंतर झिरवळ यांच्यासह दोन आमदारांनी जाळीवर उड्या मारल्या. मुख्यमंत्र्यांना आमचे ऐकावे लागेल ते ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी तयार आहे, असे काही तासांपूर्वी नरहरी झिरवळ यांनी म्हटले होते. एसटीच्या आरक्षणास धक्का लागू नये, ही मुळ मागणी आमदारांची आहे. पेसा कायद्यांतर्गत भरती करण्याची मागणी या आमदारांची आहे.
गेल्या काही दिवसांपासून आदिवासी समाजासाठी नरहरी झिरवळ आंदोलन करत आहे. त्यांनी आदिवासी समाजाच्या प्रश्नासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन वेळा भेट घेतली होती. मुख्यमंत्री आमचे ऐकत नसतील तर आमच्याकडे प्लॅन बी आहे. त्या प्लॅन बी नुसार नरहरी झिरवळ आणि इतर दोन आमदारांनी संरक्षक जाळीवर उडी मारली. त्यानंतर नरहरी झिरवळ यांची प्रकृती बिघडली. त्यांचा रक्तदाब वाढला आहे. त्यांच्या तपासणीसाठी डॉक्टरांची टीम मंत्रालयात पोहचली आहे.

error: Content is protected !!