पांगरी येथील जिल्हा परिषद शाळेतील शाळा व्यवस्थापन समिती बिनविरोध
जिंतूर,दि 05 (प्रतिनिधी):
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांगरी येथील शाळा व्यवस्थापन समिती शनिवार, दि.०५ ऑक्टोंबर रोजी शिक्षण विभागाच्या निकषाप्रमाने गठीत केली गेली. या संदर्भात आयोजित पालक सभेत प्रा. दामोधर बुधवंत यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे शाळेच्या शैक्षणिक तसेच सर्वांगीण विकासाला चालना मिळेल, असा विश्वास शाळा व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
या पालकसभेत पालक, शिक्षक व इतर पदाधिकारी यांचा सहभाग उत्साहवर्धक होता. शाळेच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी ही समिती महत्त्वपूर्ण योगदान देईल, असे मत शाळेचे मुख्याध्यापक तथा समितीचे सचिव के. सी.घुगे यांनी व्यक्त केले.
निवड प्रक्रियेत सर्व सदस्यांनी आपले समर्थन व सहकार्य दिल्याबद्दल नवनिर्वाचित समितीने आभार मानले आहेत. समिती शाळेच्या विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण सुविधा पुरवण्याचा आणि शाळेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा मानस व्यक्त केला आहे.
अध्यक्षपदी उच्च शिक्षीत प्रा.दामोधर बुधवंत यांची तर उपाध्यक्षपदी राजाभाऊ जहाने यांची निवड करण्यात आली. सदस्य म्हणून श्रीमती अनुराधा बुधवंत, वनिता उजगरे, गौकर्णा जावडे, रेणुका घणवटे, मुक्ता शेळके, गोपाळ देवकर, मुंजाजी दराडे, चंद्रशेखर कंठाळे, धनंजय क्षीरसागर, विश्वनाथ आव्हाड,
शिक्षण तज्ज्ञ श्रीमती विद्या प्रकाश घुगे,पदसिद्ध सचिव मुख्याध्यापक श्री के. सी. घुगे, शिक्षक प्रतिनिधी श्रीमती सुनंदा जाधव, विद्यार्थी प्रतिनिधी कु.वैष्णवी घळे, प्रतिक राऊत यांची बिनविरोध निवड झाली. नवनिर्वाचित सर्व पदाधिकारी सदस्यांचे शाळेच्या वतीने स्वागत करण्यात आले.शाळा व्यवस्थापन व सर्व सदस्यांनी एकत्र येऊन पुढील कार्यकाळात शाळेच्या प्रगतीसाठी कटिबद्ध असल्याचा निश्चय यावेळी सर्वांनी व्यक्त केला आहे. यावेळी पालक, गावकरी उपस्थित होते.