कुणी कितीही करा हल्ला? ;मजबूत भीमाचा किल्ला.!

0 123
  • सर्व शिल्लेदारांनी समाजकंटाविरोधात आवळल्या मुठी

माजलगांव,प्रतिनिधी:- भारतीय राज्य घटनेचे महामेरू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई महानगरातील दादर येथील निवासस्थान ‘राजगृह,इमारतीच्या आवारातील वस्तूंची तोडफोड, नासधूस ७जुलै मंगळवार रोजी तथाकथित प्रतिगामी समाज कंटकांनी माथेफिरुंना हाताशी धरून भीमाच्या किल्ल्यावर(राजगृह.) भ्याड हल्ला केला होता आणि त्याच्या विरोधात राज्यभर तीव्र पडसाद उमटले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून माजलगांव. तालुक्यातील भीमाच्या किल्याचे सर्व पक्ष,संघटनांच्या शिल्लेदारांनी भ्याड हल्ला करणारे व त्यांना चिथावणी देणाऱ्यांच्या विरोधात सनदशीर मार्गाने मुठी आवळल्या आहेत हे लक्षात घेता ‘कुणी कितीही करा रे हल्ला, लय मजबूत भीमाचा किल्ला.” याचा प्रत्यय आला होता.

सदरील हल्याचा निषेध नोंदवण्यासाठी व त्या भाडेकरू समाजकंटकांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात येऊन राजगृहाची अस्मिता जोपसलीच पाहिजे म्हणून काँग्रेस, कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ, संत सावतासेना,बहुजन वंचित आघाडी,बहुजन विकास मोर्चा आदी पक्ष,संघटने कडून उपविभागीय अधिकारी यांना निवेदने देऊन राजगृहावर हल्ला करणारे आणि त्या समाज विघातक कृत्याचे मुख्य सुत्रधार यांचा पडदाफास शासकीय यंत्रणाच्या माध्यमातून करून वास्तव जनतेच्या समोर आणावे भविष्यात कदाचित अस्मितेला तडा जाणारी घटना घडणार नाही याची खात्री पटेल अशी उपाययोजना करण्यात आली पाहिजे अशी मागणी करण्यात आली आहे.

यात कास्ट्राईब च्या वतीने जिल्हा अध्यक्ष भारत टाकणखार,वसंत टाकणखार, अनिकेत भिलेगावकर,रणजित राठोड, राहूल टाकणखार, विश्वनाथ बेद्रे,आदी. राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष शेख रशीद, जानू शहा. अनुसूचित जाती विभागाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता कांबळे, प्रकाश कसबे, राहूल जाधव. बहुजन वंचित आघाडीचे जिल्हा सहसचिव अंकुश जाधव, उपाध्यक्ष भारत तांगडे, धम्मानंद साळवे. बहुजन विकास मोर्चाचे युवा नेते सदानंद प्रधान. सावता सेनेचे ता.अध्यक्ष राम कटारे यांचा निवेदने देणाऱ्यांत समावेश आहे.

स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?

न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल

 

error: Content is protected !!