आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

4 200

पालकमंत्र्यांकडून जिल्हा शल्य चिकित्सकांची पाठराखण

परभणी, प्रतिनिधी – सध्या परभणी जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. कोरोनाच्या बाबतीत नव्याने निर्णय घेत असताना त्यांनी ज्यांना होम क्वारंटाईन व्हायचे आहे त्यांना यापुढे होम क्वारंटाईनसाठी परवानगी देण्यात येईल, परंतु अशा व्यक्तींना आयसीएमआरच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करावे लागेल. तसेच अशा व्यक्तींनी घराबाहेर पडू नये यासाठी प्रशासनाव्दारे सर्वतोपरी खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे मत परभणी जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांनी मांडले.

lokseva multiservices

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत पालकमंत्री नवाब मलिक बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी पृथ्वीराज बी.पी., जिल्हा पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय,महानगरपालिका आयुक्त  देविदास पवार आदींची उपस्थिती होती.

यावेळी पालकमंत्री मलिक पुढे म्हणाले की, आयसीएमआरच्या नव्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे ज्या व्यक्तींनी होम क्वारंटाईनला प्राधान्य दिले आहे. अशा व्यक्तींना निश्चीतच होम क्वारंटाईनसाठी प्रशासनाद्वारे परवानगी दिली जाईल. परंतू या व्यक्तींनी घराबाहेर पडू नये, यादृष्टीने प्रशासनाद्वारे सर्वतोपतरी खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

shriniwasa add

विशेषतः ज्या घरात लोकांना क्वारंटाईन करण्यात येईल अशा घरांच्या प्रवेशद्वारास प्रशासनाद्वारे सील ठोकणार असून त्या घरांच्या दर्शनी भागात फलक लावून या घरातल्या व्यक्ती होमक्वारंटाईन केलेल्या आहेत, अशी नोंद करावी. शक्य आहे त्या ठिकाणी काही कर्मचारी ही तैनात करून होम क्वारंटाईन झालेल्या व्यक्तींवर लक्ष ठेवावे. होम क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना लागणार्‍या जिवनावश्यक वस्तु किंवा गरजांची पूर्तता करण्याचे नियोजन करावे.

कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात क्वारंटाईन केलेल्या व्यक्तींना आप-आपल्या घरामधूनच (होम क्वारंटाईन) बंदिस्त राहण्यास जिल्हा प्रशासनाद्वारे मुभा देण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री नवाब मलिक यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांच्या आदेशाद्वारे 17 जुलैच्या मध्यरात्री पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परंतू कोरोनाचा प्रादूर्भाव वाढत असल्याने तसेच रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी आणखीन दोन दिवस संचारबंदी वाढीचा निर्णय जिल्हा प्रशासनाच्या अधिकार्‍यांशी चर्चा करुन घेतला.

तसेच कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर शनिवारपासून शहरासह जिल्ह्यात सर्व नागरी व ग्रामीण क्षेत्रात स्थानिक स्वराज्य संस्था व आरोग्य पथकांच्या माध्यमातून डोअर-टू-डोअर व्यापक सर्व्हेक्षण मोहिम हाती घेण्यात यावी अशा सूचना पालकमंत्री नवाब मलिक यांनी यावेळी दिल्या.
जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या पुरेशी नाही.

याकरीता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरासह जिल्ह्यात शासकीय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयाकरिता 16 रूग्णवाहिका लोकप्रतिनिधींच्या स्थानिक विकास निधीतून उपलब्ध करणार असल्याची माहितीही पालकमंत्री नवाब मलिक यांनी दिली. जिल्ह्यात शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकार्‍यांच्या मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत.

याकरीता मुळ परभणीतील मात्र मुंबईतील वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना परभणीत पाचारण करण्या संदर्भात विचार विनिमय सुरू असुन, यानुसार 12 ते 14 डॉक्टर्स उपलब्ध झाल्यास निश्चीतच कोरोना विरूद्ध लढा देण्यास मदत होईल, असा विश्वासही पालकमंत्री मलिक यांनी यावेळी व्यक्त केला.

पालकमंत्र्यांकडून जिल्हा शल्य चिकित्सकांची पाठराखण
जिल्हयातील आरोग्य सुविधांबाबत पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला असतानाही पालकमंत्र्यांकडून मात्र जिल्हा शल्यचिकित्सकांची पाठराखणच करण्यात आल्याचे पहावयास मिळाले तर जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांचे मात्र त्यांनी तोंड भरून कौतुक केले.

पत्रकार परिषदेत पत्रकारांनी आरोग्य असुविधा बाबत अनेक मुद्दे उपस्थित केले. परंतु यावर त्यांनी पालकमंत्री मलिक यांनी जिल्हा शल्य चिकिसकांना पाठीशी घालत या समस्या तातडीने सोडवण्यात येतील असे सांगितले. तसेच जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी सुरवातीपासूनच सुनियोजितरित्या परिस्थिती नियंत्रणात ठेवल्याबद्दल समाधान व्यक्त केले .

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!