आळंदीत भाजपकडून मास्क आणि सॅनीटायजरचे वाटप
आळंदी,दि 25 (प्रतिनिधी)ः पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदी शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आळंदीतील आरोग्य सेवक, वारकरी आणि विविध संस्थेला मास्क आणि सॅनीटायजर चे वाटप करण्यात आले आहे.
यावेळी पंडीत दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार आळंदी नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर यांच्या हस्ते अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी भाजप चे जिल्हा संघटक धर्मेंद्र खांडरे,भाजप आध्यात्मिक विकास आघाडीचे सह संयोजक संजय महाराज घुंडरे,आळंदी नगरपरिषदेचे नगरसेवक सचिन गिलबिले,भाजपचे शहराध्यक्ष किरण येळवंडे,माजी नगरसेवक अशोक उमरगेकर,दिनेश घुले, संतोष गावडे,पांडुरंग ठाकूर,गुलाबराव खांडेभराड,बंडूनाना काळे, आकाश जोशी,माऊली बनसोडे,भागवत काटकर,संदेश जाधव आदि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना भाजपचे जिल्हा संघटक धर्मेंद्र खांडरे म्हणाले की भारतीय जनसंघाच्या पायाभरणीत ज्या मोजक्या व्यक्तींनी प्रमुख भूमिका बजावली होती, त्यांच्यामध्ये पंडित दीनदयाळ उपाध्याय यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते.
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्यासह पंडित उपाध्याय यांनी भारतीय जनसंघाच्या उभारणीसाठी खूप मेहनत घेतली होती. भारतीय जनसंघाचे राष्ट्रीय सचिव म्हणून उपाध्याय कार्यरत होते. याच भारतीय जनसंघातून पुढे आज सत्तेत आणि चर्चेत असणार्या भारतीय जनता पक्षाचा उगम झाला.यावेळी माजी नगरसेवक अशोक उमरगेकर यांनी सुध्दा मार्गदर्शन केले, कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय घुंडरे यानी, तर सूत्रसंचालन संदेश जाधव यांनी केले.