आळंदी शहरातील सर्व नागरिकांची आरोग्य तपासणी होणार : मुख्याधिकारी अंकुश जाधव

0 112

आळंदी,प्रतिनिधी : आळंदी शहरात कोरोणा रुग्णांचे प्रमाण वाढत असून हा कोरोणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार आळंदी नगरपरिषदेच्या सर्व प्रभागातील नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

आळंदी शहरातील सर्व ९ प्रभागात आरोग्य तपासणी करण्यासाठी १०८ शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून प्रत्येक प्रभागात १० शिक्षक अशी ९ पथके तयार करण्यात आली असून त्यांना प्रत्येक नागरिकांची वैयक्तिक रित्या आरोग्य तपासणी करण्याचे आदेश दिले असून सर्व शिक्षकांना आरोग्य तपासणी करण्यासाठी सुरक्षा कवच म्हणून मास्क, सॅनीटायजर, हॅन्डग्लोज पुरविण्यात आले आहे तसेच शरीरातील तापमान थर्मल स्कॅनरने तपासण्यात येणार आहे.

आळंदी शहरात डेंग्यू, चिकन गुनिया आणि ईतर आजाराबाबतीत सुध्दा तपासणी करण्यात येणार आहे. त्याच बरोबर ६० वर्षा पेक्षा अधिक असणारे ज्येष्ठ नागरिक, मधुमेह, उच्च रक्तदाब, गरोदर माता ईत्यादींचाही सर्वे आळंदी नगरपरिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे तरी सर्व नागरिकांनी सहकार्य करावे तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चालू असलेल्या संचारबंदी कालावधीतील प्रशासनाने सांगितलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून आळंदी शहराला कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अंकुश जाधव यांनी सांगितले.

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!