कोरोना लसीचे वितरण सुरु

0 106

पुणे – सीरम इन्स्टिट्यूने आपल्या कोरोना प्रतिबंधक लस कोव्हिशिल्डचा पुरवठा करण्यास आजपासून सुरुवात केली आहे. आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून कोव्हिशिल्ड लसीची पहिली बॅच रवाना झाली आहे. कोरोना प्रतिबंधक लसीचे तीन ट्रक सीरम इन्स्टिट्युटमधून पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाले आहेत. एअरपोर्टहून लसीचे डोस देशभरात पाठवण्यात येणार आहेत. 16 जानेवारीपासून देशात प्रत्यक्ष लसीकरणाला सुरुवात होणार आहे.

 

कोव्हिशिल्ड लसीच्या पहिल्या बॅचचे ट्रक पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटमधून रवाना झाले असून सीरम इन्स्टिट्यूटपासून या वाहनाला पोलिसांनी एअरपोर्टपर्यंत सुरक्षा पुरवली. पोलिसांकडून त्याआधी लस घेऊन जाणाऱ्या या गाडीची पुजाही करण्यात आली. पुणे एअरपोर्टवरुन कार्गो विमानांद्वारे ही लस देशभरात पाठवली जाणार आहे. अशाप्रकारची आणखी तीन वाहने आज लसीचे डोस घेऊन पुणे एअरपोर्टला रवाना होणार आहेत. केंद्र सरकारने काल कोव्हिशिल्डचे एक कोटी दहा लाख डोस पुरवण्यासाठी सीरम इन्स्टिट्यूटला ऑर्डर दिल्यानंतर आजपासून सीरम इन्स्टिट्यूटकडून ही लस पाठवणे सुरु करण्यात आले आहे.

shabdraj reporter add

याबाबत माहिती देताना पुणे झोन-5 च्या डीसीपी नम्रता पाटील यांनी सांगितले की, कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली बॅच पोलिसांच्या सुरक्षेत पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया येथून रवाना झाली आहे. पुणे एअरपोर्टहून लसीच्या एअर ट्रान्सपोर्टची जबाबदारी सांभाळणारी कंपनी एसबी लॉजिस्टिकचे एमडी संदीप भोसले यांनी सांगितले की, एकूण आठ फ्लाइट्स कोव्हिशिल्ड लस पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देशातील 13 ठिकाणी पोहोचवली जाणार आहे. पहिली तुकडी दिल्ली विमानतळासाठी रवाना करण्यात आली आहे.

lokseva sticker

कोरोना प्रतिबंधक लसीची पहिली बॅच आज गुजरातमध्ये पोहोचणार आहे. सकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी गुजरातच्या अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर लसींची पहिली बॅच उपलब्ध होणार आहे. उपमुख्यमंत्री नितिन पटेल यांना सांगितले की, लसीकरणाशी संबंधित सर्व तयाऱ्या पूर्ण झाल्या आहेत. गुजरातमध्ये कोरोना लसीकरण अभियान 25,000 सेंटर्सवर सुरु होणार आहे. ते पुढे बोलताना म्हणाले की, पंतप्रधान मोदी 16 जानेवारी रोजी गुजरातच्या 287 सेंटर्सवर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे जोडले जातील. यादरम्यान अहमदाबाद आणि राजकोटमधील दोन ठिकाणांवरील डॉक्टर्स आणि लस टोचून घेणाऱ्या व्यक्तींशी संवाद साधतील.

error: Content is protected !!