जागतिक विक्रमाला गवसणी घालणाऱ्या विद्यार्थ्यांचे संभाजीसेनेच्या वतीने जन्मभूमीत स्वागत

1 97

परभणी,दि 10 (प्रतिनिधी)ः
डॉ.एपीजे अब्दुल कलाम स्पेस रिसर्च पेलोड कुक्स चॅलेंज २०२१ या डॉ.कलाम इंटरनॅशनल फाऊंडेशन स्पेस झोन इंडिया आणि मार्टीन ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने राबवलेल्या प्रक्षेपन प्रकल्पात देशभरातील १ हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत हेलियम बलूनद्वारे एकाचवेळी १०० उपग्रह अवकाशात प्रक्षेपण करून विश्वविक्रम, अशिया विक्रम, भारतीय विक्रम, असिस्ट जागतिक विक्रम स्थापित केला़ या बालवैज्ञानिकांचे संभाजीसेनेच्या वतीने परभणी येथील रेल्वेस्थानकावर महाराष्ट्राच्या पारंपरिक वेशभूषेतील गोंधळी व संभळ वाद्यसह भव्य स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील ३९८ विद्यार्थ्यांनी ३९ उपग्रह बनवून उपक्रमात सिंहाचा वाटा नोंदवला होता़ हे जगातील सर्वात कमी वजनाचे म्हजे उपग्रह २५ ते ८० वजनाचे असून याचे प्रक्षेपन रामेश्वरम येथून करण्यात आले़ यामध्ये परभणीतील केएनपी इन्स्टिट्युटच्या सात विद्यार्थ्यांनीही भरीव कामगिरी करत परभणीकरांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. परभणीतील विद्यार्थ्यांचे मंगळवारी दि़९ रोजी रेल्वेस्थानकावर आगमन झाल्यानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले़
तांमीळनाडू राज्यातील रामेश्वरम येथे रविवारी दि़७ फेब्रुवारी रोजी देशभरातील बालवैज्ञानिकांनी आपले अंतराळ प्रक्षेपन प्रयोग सादर केले. परभणीतील केएनपी इन्स्टीट्युटच्या सात बालवैज्ञानीकांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत जागतिक विक्रमाला गवसणी घातली. राज्यभरातील ३९८ विद्यार्थ्यांनी ३९ उपग्रह बनवून या उपक्रमात सिंहाचा वाटा उचलला. यावेळी सहभागी विद्यार्थ्यांसह त्यांचे पालक, शिक्षक आदिंनी हा विक्रम प्रत्यक्षात पाहिला़ महाराष्ट्रातर्फे प्रक्षेपणाआधी तिरंगा फडकावीत तिरंग्याला मानवंदना देत मनिषाताई चौधरी यांचे नेतृत्वात परभणीच्या विद्यार्थ्यांसह प्रक्षेपण स्थळापर्यंत तिरंगा मार्च करण्यात आला़ यात परभणीतील बालविद्या विहारचा युवराज राजकुमार भांबरे, संस्कृती विद्यानिकेतनची कल्पना पत्की, कल्पेश पत्की, सीमा कॉलेजचा आदित्य चौधरी, सेंट आॅगस्टीनचा अक्षद चौधरी, बालविद्या मंदिराची वेदीका कुल्थे, केंद्रीय विद्यालयाची अनन्या चौधरी या सात विद्यार्थ्यांनी परभणीचे नाव उज्वल केले. त्यांना केएनपी संस्थेचे डायरेक्टर मेघशाम पत्की यांचे मोलाचे सहकार्य लाभले. दरम्यान, या बाल वैज्ञानिकांनी दिल्ली ते कन्याकुमारी पर्यंतच्या विविध वैज्ञानिक प्रयोगात परभणीचा यशस्वी झेंडा रोवला आहे.
या यशस्वी विद्यार्थ्यांचे मंगळवारी दि़९ फेब्रुवारी रोजी रात्री परभणीत आगमन झाले़ परभणीकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवणाºया यशस्वी विद्यार्थ्यांचे आगमन होताच संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे,सुभाष जावळे, विठ्ठल तळेकर, अनंत पांडे,राजकुमार भांबरें, प्रा विष्णू नवपुते,अरुण मराठे ,प्रा राजेश रनखांबे,प्रा मोडक, रितेश जैन,ज्ञानोबा शिंदे,मारोती शिंदे,प्रल्हाद शिंदे,देसरडा मॅडम,सुनील रामपूरकर डॉ निलेश झरकर राजेंद्र सोनी डॉ चिद्रवार प्रसन्न भावसार,सोनू पवार,विशाल कळसाईतकर आदिंनी त्यांचे भव्य स्वागत केले़

error: Content is protected !!