झाडे लावा मात्र त्यांचे संगोपन आवश्यक-माजी आ.मोहनराव सोळंके

0 101

 माजलगांवात केला झाडांचा वाढदिवस

माजलगांव, प्रतिनिधी:- अनेक ठिकाणी मोठ्या उत्साहात झाडे तर लावण्यात येतात, मात्र त्यांचे पुढील संगोपन करण्यास कोणी गंभीरतेने घेत नाही परिणामी झाडे जगत नाहीत असे चित्र बहुतांश ठिकाणी दिसते.मात्र गतवर्षी येथील जुन्या मोंढ्यात वृक्षप्रेमींनी लावलेल्या १०० झाडांचे वर्षभर संगोपन करून काळजी घेतल्याने ती झाडे मोठ्या जोमाने डोलत आहे,त्यामुळे झाडे लावा पण त्यांचे संगोपन देखील तेवढ्याच काळजीने करा असे आवाहन माजी आमदार मोहनराव सोळंके यांनी केले.

 

माजलगांव शहरातील जुन्या मोंढ्यात गतवर्षी वृक्षारोपण केलेल्या त्या झाडांचा आज मंगळवारी दि.७ रोजी झाडांना पाणी देऊन मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा करण्यात आला.याप्रसंगी माजी आमदार सोळंके बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी अच्युतराव लाटे हे होते.

 

या वाढदिवसाचे औचित्य साधून झाडांची दररोज निगा राखणाऱ्या व्यापारी महावीर ओस्तवाल, ज्ञानराधा मल्टीस्टेटचे व्यवस्थापक विनोद भोंडवे यांचा पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

 

या प्रसंगी कालिदासराव होके,लतीफ नाईक,मुरलीधर रत्नपारखी, प्रभाकर शेटे,पांडुरंग चांडक,ईश्वर खुर्पे,पांडुरंग जुजगर,मोहन चोरमले,कल्याण नरवाडकर,सुधीर वैद्य, विनोद जाधव,डॉ.भले यांची उपस्थिती होती.

 

महावितरणच्या भरतीचा परीक्षार्थींना Shock : भाग-१

 

error: Content is protected !!