नोकरीच्या प्रयत्नात बेरोजगार तरुणांच्या पैशाला चुना, पदभरतीमधील बेरोजगार तरुणांची लुट थांबवा- सिकंदर शाह

0 197

यवतमाळ,प्रतिनिधी – राज्यात बेरोजगार तरुणांची अवस्था बिकट झाली आहे. लाखो तरुण नोकरीसाठी सतत प्रयत्नशील असले तरी त्यांच्या फक्त पैशाला चुना लागत आहे. दरम्यान फक्त फॉर्म भरायला लाऊन पैसे जमा करणा-या सरकारने पदभरती सुरु करावी अन्यथा बेरोजगार तरुणांचे पैसे परत करावे अशी मागणी शेतकरी वारकरी संघटनेचे अध्यक्ष सिकंदर शहा यांनी राज्य सरकारकडे केली आहे.

गेल्या वर्षभरात पोलिस, पशुसंवर्धन सह अनेक विभागात पदभरतीची जाहिरात सरकारने प्रकाशित केली होती. ही नोकरी मिळावी म्हणून राज्यातील लाखो तरुणांनी सरकारकडे अर्ज सादर केले. अर्ज सादर करतांना सर्वच प्रवर्गातील बेरोजगार तरुणांना शंभर रुपयापासून पाचशे रुपया पर्यन्त सरासरी फी भरावी लागली. याशिवाय ऑनलाईन फॉर्म भरतांना 50 ते 100 रुपये सायबर कॅफे वाल्याला सुध्दा फॉर्म अपलोड करण्याचे द्यावे लागले. एवढे सर्व करुनही एैन वेळेवर पदभरती रद्द करणे अथवा ती समोर ढकलण्याचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढले आहे. पदभरती समोर ढकलल्यानंतर ती पुन्हा घेण्याची तसदी सुध्दा घेतली जात नाही.

अनेक जागांची सर्व प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर दोन वर्षपर्यन्त निकाल लावला जात नाही. दोन वर्षाने निकाल लागतो तर तोही माहित होत नसल्याची तक्रार बेरोजगार तरुणांनी सिकंदर शहा यांच्याकडे केली आहे.

मुंबई येथील पोलिस भरती साठी एकटया यवतमाळ जिल्हयातून 6 हजार 500 बेरोजगार तरुणांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. ही पदभरती रद्द झाली मात्र पैसे परत मिळाले नाही. संपुर्ण राज्यातून लाखो तरुणांनी पोलिस भरती साठी विविध ठिकाणी अर्ज सादर केले आहे. यवतमाळच्या मध्यवर्ती बॅंकेच्या पदभरती मध्ये 1 हजार रुपयांचा डीडी काढावा लागला. परीक्षा अमरावती येथे घेण्यात आल्याने प्रत्तेक उमेदवाराला परीक्षा फि, प्रवास, अॅटो, जेवण असा एकून जवळपास अठराशे ते दोन हजार रुपये खर्च आला.

या पदभरतीवर आता स्टे आला आहे. एकंदरीत राज्यातील लाखो बेरोजगार तरुणांचे पैसे सरकारकडे पडून असल्याने ते परत करण्याची मागणी सिकंदर शाह यांनी केली आहे. पदभरती चे नियोजन आवश्यक राज्यात होणा-या पदभरती मध्ये मोठया प्रमाणात घोळ होत आहे. यामुळे बेरोजगार तरुणांमध्ये नैराश्याची भावना निर्माण झाली आहे.

सरकारने पदभरती बाबत योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. तरुणांच्या हाताला काम नाही त्यातच मोठया प्रमाणात फि च्या नावाखाली पैसे गोळा केले जात आहे. सरकारने बेरोजगार तरुणांचे पैसे परत करावे तसेच पदभरती मध्ये परदर्शकता आनून बेरोजगार तरुणांना न्याय द्यावा अशी आमची मागणी आहे.

– सिकंदर शाह अध्यक्ष, शेतकरी वारकरी संघटना

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!