परभणीत शिवसेना आक्रमक,केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या विरोधात जोरदार निदर्शने
परभणी,दि 24 (प्रतिनिधी)ः
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याबद्दल सर्व राज्यभरात पडसाद उमटत आहेत.परभणी येथे देखील शिवसेना आक्रमक झाली असून मंगळवारी (दि.24) छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या निषेधार्थ शिवसेनेच्या संतप्त कार्यकर्त्यांनी येथील जोरदार निदर्शने केली.
यावेळी शिवसैनिकांनी राणे यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे ही दहन करण्याचा प्रयत्न केला.पोलीस आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांत शाब्दीक चकमक उडाली. यावेळी राणे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. यावेळी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात होता.
आमदार डॉ. राहूल पाटील जिल्हाप्रमुख विशाल कदम,विधानसभा संघटक माणिकराव पोंढे, रवी पतंगे, सदाशिव देशमुख, डॉ. विवेक नावंदर,राहुल खटिंग मकरंद कुलकर्णी, सखुबाई लटपटे,संजय गाडगे,चंदू शिंदे,नितीन कदम, रामप्रसाद रणेर, संजय सारणीकर ,अमोल भालेराव, प्रदीप भालेराव, अंबिका डहाळे, कुसुम पिल्लेवाड,गजानन देशमुख, अरविंद देशमुख ,बाळराजे तळेकर,विशू डहाळे, नंदू अवचार, शेख शब्बीर आदी शेकडो कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी होते.