पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी यांची लाच लुतपत मार्फत चौकशी लावा-अनिल पाटील

0 162

आ़़टपाडी, प्रतिनिधी – पाटबंधारे विभागाकडे मंजुर पाणी परवान्याचे क्षेत्र वाढवून घेण्यासाठी आटपाडीत शेतकऱ्याकडे चक्क २१ हजाराची मागणी करण्याच्या प्रकरणाचा भांडाफोड युवा नेते अनिल पाटील यांनी केला. आटपाडी पाटबंधारेचे शाखाधिकारी यांनी पैसे मागितल्याचे चित्रीकरणच सादर करत शेतक-यांना लुटणा-या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी करण्यात आली. दरम्यान, हे प्रकरण चव्हाट्यावर आल्यानंतर शाखाधिकारी यांनी तडकाफडकी राजीनामा दिला.

आटपाडी तालुक्यातील मुढेवाडी येथील मधुकर खोत व मोहन मुढे यांनी पाटबंधारे विभागाकडुन कामथ तलावातुन पाणी उपशाचे परवाने घेतले आहे. सदर उपशाचा यंत्र परवाना वाढविण्यासाठी संबंधितानी पाणी परवाना क्षेत्र वाढवुन घेण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. तो प्रस्ताव टेंभू उपसा सिंचन व्यवस्थापन उपविभाग तासगाव येथून मे महिन्यात परत आला.

हा प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्यासाठी २१ हजार रूपये द्यावेत. एक कागदही न घेता तो परवाना मंजुर करून देवू. शिवाय येणाऱ्या पाणीपट्टीतही सुट देण्यासाठी सदरची रक्कम द्यावी, अशी मागणी आटपाडी पाटबंधारे विभागाचे शाखाधिकारी यांनी भारत मोहन मुढे याच्याकडे केली.

सदर तरूणाने ही बाब युवा नेते अनिल पाटील यांना सांगितली , पाटील यांनी  याचा जाब विचारला असता, कागदपत्रे अपुरी असल्याने उपसा यंत्र परवाना बाढविण्यासाठी ही रक्कम मागितल्याचे कबूल केले. टेंभुचे कार्यकारी अभियंता रेडीयार यांच्याशी अनिल पाटील यांनी संपर्क साधुन आटपाडीतील अधिकाऱ्याच्या उद्योगाची माहिती दिली. या प्रकरणी कारवाईची ग्वाही अधिकारी रेडीयार यांनी दिली.

मुळात शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोहविण्यासाठी प्रशासनाने सहकार्य करावे, अशा सुचना खासदार संजयकाका पाटील यांनी अधिका-यांना केल्या होत्या. तरीदेखील परवान्यासाठी २१ हजाराची मागणी करून अडवणुक करण्यात आली. पाटबंधारे कार्यालयात सुरू असणाऱ्या या लुटीचा पत्रकारापुढेही पंचनामा करण्यात आला.

अनिल (शेठ) ,पाटील यांनी आटपाडी तालुक्यातील जनतेला आव्हान केले आहे शासकीय कामासाठी अधिकारी यांनी पैशाची मागणी केली तर डायरेक्ट संपर्क साधण्याचे आव्हान केले आहे . कोणत्याही अधिकारी असेल तर त्याचा जाब विचारला जाईल. जे चांगले काम करतात अश्या अधिकारी यांचा सन्मान निश्चितच केला जाईल . सध्या कोरोना परिस्थिती मुळे जनता अडचणीत आहे. तरी सर्व अधिकारी यांनी जनतेची कामे विनामूल्य करावीत. सरकार आपणास मोठा पगार देत असते.

आटपाडी मधील जनता, शेतकरी, पत्रकार, राजकीय नेते, टीव्ही पत्रकार यांनी फोन करून प्रत्येक्ष भेटून पाटील यांचे अभिनंदन केले आहे व समाधान व्यक्त केले आहे.

दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मारोती महाकाळकर व गोपाल कांबळे यांच्यासह अनेक दिव्यांग लोकांचा ‘मनसे’त प्रवेश….

error: Content is protected !!