प्रशासनाच्या अयोग्य निर्णयामुळे जळगाव शहरात वाहतुकीच्या कोंडीमुळे कोरोना रुग्णांत वाढ

0 101

जळगाव,प्रतिनिधी –  जळगाव शहरात कडक लॉकडाऊन नंतर मंगळवार दिनांक 14 जुलै 2020 पासून पुन्हा शहरातील व्यवहार अनलॉक 2 च्या धोरणानुसार पूर्ववत होईल अशी अपेक्षा होती. मात्र प्रशासनाने जळगाव शहरातील बाजार पेठ व प्रमुख रस्ते सील करण्याचा निर्णय मूर्खपणाचा घेतलेला असून त्यातून गर्दी नियंत्रणात येणे दूरच राहिले. उलटपक्षी रस्ते उप रस्ते व छोट्या गल्ल्या मध्ये वाहतुकीची कोंडी झाल्याचे चित्र 3 दिवसापासून दिसत आहे. प्रशासनाच्या या निर्णयाबद्दल सर्वच स्तरातून टीका होत आहे. जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा वाढत संसर्ग पाहता जिल्हाधिकाऱ्यांनी 7 जुलै 2020 ते 13 जुलै 2020 पर्यंत जळगाव शहरासह अमळनेर ,भुसावळ येथे कडक लॉकडाऊन जाहीर केला होता. प्रशासनाच्या प्रयत्नांना जळगावकरांनी तेवढ्याच प्रमाणे सहकार्य केले.

मात्र प्रशासनाच्या अयोग्य निर्णयामुळे फुले मार्केट ,गांधी मार्केट, सुभाष चौक ,सराफ बाजार , पोलन पेठ ,बोहरा बाजार ,नवी पेठ आदी भागात येणारे सर्व रस्ते सील केले. या रस्त्यावर गर्दी होऊ नये हा त्यामागच्या उद्देश होता. मात्र प्रशासनाचा हा निर्णय आता आत्मघातकी ठरु लागला आहे. सर्व प्रमुख रस्त्यांना लागून असलेल्या रस्ता – उप रस्त्यावर वाहनांची प्रचंड गर्दी होत आहेत. तुलनेने रस्ते अरुंद असल्याने रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत असून मिळेन त्या ठिकाणी वाहन लावून नागरिक खरेदी व अन्य कामासाठी बाजार पेठेत जात आहे. त्यामुळे गर्दी नियंत्रणाच्या उदेशाला हरताळ फासला गेला आहे.

प्रशासनाच्या उपाय योजनेचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. तसेच वाहतुकीच्या कोंडी मुळे सोशल डिस्टंसीनचा फज्जा उडत आहे. पर्यायाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. प्रशासन यासर्व गोष्टी कडे बघण्यास धीम्म आहे . मात्र नागरिक प्रशासनाच्या अयोग्य नियोजनाबद्दल संताप व्यक्त करत आहे. या पूर्वी कधी न पाहिलेली गर्दी ह्या 3 दिवसापासून होत आहे. तेव्हा प्रशासनाने जागे होऊन काही ठिकाणी सील केले रस्ते मोकळे करावे असे संतप्त नागरिकांचे म्हणणे आहे.

आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….

गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी

 

error: Content is protected !!