ब्रेकिंग न्यूज : मोबाईलधारक एका दिवसात आता पाठवु शकतात ‘100’ पेक्षा जास्त मेसेज; ट्रायने घेतला मोठा निर्णय
ब्युरो रिपोर्ट – भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (ट्राय) ने एका दिवसात मोफत एसएमएस पाठवण्याची मर्यादा पूर्णपणे बंद केली आहे. आता मोबाइल ग्राहक दिवसभरात हवे तेवढे एसएमएस मोफत पाठवू शकतात. यापूर्वी मोबाइल ग्राहकाला दिवसभरात केवळ 100 एसएमएस च मोफत होते. यानंतर त्यांना प्रति एसएमएस 50 पैसे शुल्क द्यावे लागत होते. ट्रायने यासाठी सर्व स्टेक होल्डर्ससाठी टेलिकम्युनिकेशन टॅरिफ (65वी दुरूस्ती) ऑर्डर 2020चा ड्राफ्ट जारी केला आहे.
2012 मध्ये लागू झालेल्या नियमांतर्गत 100 एसएमएसनंतर 50 पैशांचा चार्ज लागत होता. आता ट्रायने म्हटले आहे की, स्पॅम मेसेजला रोखण्यासाठी टेक्नॉलॉजी आहे, डिएनडी सर्व्हिसद्वारे यूजर्स आपल्या नंबरवर येणार्या जाहिरातींना रोखू शकतो. ट्रायने म्हटले की, टीसीसीसीपीआर 2018 अंतर्गत निर्धारित नवीन रेग्युलेटरी फ्रेमवर्क टेक्नोलॉजीवर आधारित आहे. हे स्पॅम एसएमएसवर अंकुश ठेवू शकते. ट्रायने टेलिकम्युनिकेशन्स टेरिफ (65वी दुरूस्ती) ऑर्डर, 2020 चा ड्राफ्ट तयार केला होता.
IPL : आयपीएलचा तेरावा हंगाम भारताबाहेर?? BCCI कडून विविध पर्यायांवर विचार सुरु
तबलिगी जमातच्या २५५० परदेशी सदस्यांना १० वर्षांसाठी भारत प्रवेशास बंदी, गृहमंत्रालयाची मोठी कारवाई
मद्यविक्रीमुळे राज्याच्या तिजोरीत भर घालण्यात पुण्याचा मोठा हातभार
अनलॉक 1 अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील लॉकडाऊनचे अनेक निर्बंध शिथील
TikTok च्या डाऊनलोड्समध्ये भारतात मागील दोन 2 महिन्यात 51% घसरण; व्यवसायाची वाट बिकट
मिशन बिगीन अगेनची नवी नियमावली जाहीर; या ठिकाणी दिली जिल्ह्यांतर्गत प्रवासाला परवानगी