मराठवाड्यातील नवीन विद्यापीठाला संत भगवानबाबा यांचे नाव द्यावे – आम्ही वारकरीची मागणी
पुणे – डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन होणार असून उस्मानाबाद येथे नवीन विद्यापीठ स्थापन होणार असल्याची चर्चा समाजात आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाचा विस्तार पाहता नवीन स्वतंत्र विद्यापीठ आवश्यक आहे. आपण राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहात. आम्ही वारकरी आपणास नम्र विनंती करु इच्छितो की मराठवाड्यात जे नवीन विद्यापीठ उभारले जाणार आहे. त्याला राष्ट्रसंत भगवान बाबा यांचे नाव देण्यात यावे. अशी मागणी आम्ही वारकरी संस्थेच्या वतीने अध्यक्ष रामभाऊ चोपदार, वारकरी दर्पणचे सचिन पवार यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे. संत भगवान बाबा यांचे अध्यत्मासोबत अंधश्रद्धा निमुर्लन, जाती-भेद शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी संत भगवान बाबांनी संपूर्ण आयुष्य अर्पण केले होते. नवीन विद्यापीठाला त्यांचे नाव दिले तर ते त्यांचे यथोचित स्मारक ठरेल.