मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या तिसर्या पर्वास 9 ऑक्टोबर पासून प्रारंभ
आई जगदंबेच्या दरबारात होणार मराठ्यांचा जागर कार्यक्रम
धाराशिव – मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी आई तुळजाभवानीच्या पवित्र नगरीत मराठा ठोक क्रांती मोर्चाचे तिसरे पर्व मराठ्यांचा जागर हा कार्यक्रम शुक्रवार, दि.9 ऑक्टोबर रोजी तुळजापुरातून सुरुवात होत आहे. आता हा मुक मोर्चा नसून ठोक मोर्चाची सुरुवात करत असल्याचा इशारा मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज (दि.24) रोजी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या बाबत विस्ताराने बोलताना मराठा ठोक मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी मराठा आरक्षणावरील सर्वोच्च न्यायालयाची अंतरिम स्थगिती दि.9 सप्टेंबर रोजी दिलेली आहे. ही स्थगिती उठवण्याची सर्वस्वी जबाबदारी केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाची आहे. तरी महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयामधून स्थगिती उठवून मराठा समाजाला पुर्वरत आरक्षण द्यावे. केंद्र सरकारने आर्थिक दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण दिले आहे. त्या आरक्षणाचा लाभ मराठा समाजाला मिळावा. यासाठी राज्य सरकारने तसा जी.आर. काढून मराठा समाजाचा समावेश करणे संबंधी कार्यवाही करावी. महाराष्ट्र शासनाने विविध खात्यातील मेघाभरती हि मराठा आरक्षणा नंतर करावी. या नोकर भरतीस तात्काळ स्थगिती द्यावी. मराठा समाजाच्या विविध मागण्यासाठी संघटनांच्या माध्यमातून केलेल्या आंदोलनामधील दाखल केलेले सर्व गुन्हे मागे घ्यावे. कोपर्डी प्रकरणातील दोषींना न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची तात्काळ अंमलबजावणी करावी. मराठा आरक्षणासाठी ज्या युवकांनी बलिदान दिले आहे. त्या कुटुंबाच्या पुनर्वसनासाठी दहा लाखांची आर्थिक मदत करावी. कुटुंबातील एका व्यक्तीस शासकिय नौकरी द्यावी. शिक्षण प्रवेश प्रक्रिया पुर्ववत चालू ठेवण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. आयोजित पत्रकार परिषदेस मराठा ठोक क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे, राज्य समन्वयक सुनिल नागणे, राज्य समन्वयक सज्जनराव साळुंके, अमरराजे परमेश्वर, जीवनराजे इंगळे, महेश गवळी, अर्जुन आप्पा साळुंके, हनुमंत गवळी, आबा कापसे, कुमार टोले, आण्णा क्षिरसागर, प्रशांत अपराध, दत्ता मोरे, विशाल सावंत, शिवाजी जाधव आदिंची उपस्थिती होती. या पत्रकार परिषदेनंतर कार्यकत्यांनी एक मराठा लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे आदि घोषणाबाजी केली.