मोठी बातमी ! न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

0 410

रत्नागिरी, 24 ऑगस्ट : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज रत्नागिरी न्यायलयाने फेटाळला आहे. त्यामुळे आता नारायण राणेंच्या अटकेची दाट शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात देखील जामिनासाठी अर्ज केला असून मुंबई उच्च न्यायालय राणे यांचा अर्ज स्वीकारत त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर करणार की फेटाळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.

नारायण राणे यांच्या अटकेची शक्यता लक्षात घेता भारतीय जनता पक्षाने विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना कोकणाकडे रवाना केलं आहे. जेणेकरुन जर नारायण राणे यांना अटक झाल्यास त्यांची जनआशीर्वाद यात्रा ही प्रवीण दरेकर पुढे चालवतील.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रत्नागिरी न्यायालयाने नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.

नारायण राणे यांचा मुंबई उच्च न्यायालयाकडून रत्नागिरी सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द करून घेण्याचा प्रयत्न आहे. मात्र रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना अटक करण्याची कारवाई सुरू करत असल्याचे वृत्त आहे. नाशिक पोलिसांनी राणे यांना अटक करण्याची तयारी सुरू केली होती. मात्र, आता नाशिक पोलिसांनी पुढील अटकेची कारवाई रत्नागिरी पोलिसांनी करावी अशी विनंती केल्यानंतर रत्नागिरी पोलिसांनी ही कारवाई सुरू केल्याचे वृत्त आहे.

अटकेची टांगती तलवार कायम

आम्ही रत्नागिरी सत्र न्यायालयाने दिलेला जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयात रदद करून घेऊ, असे भाजप नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटले आहे. सरकार सूड भावनेने ही कारवाई करत असून आम्ही उच्च न्यायालयात कायदेशीर लढाई लढू असे दरेकर म्हणाले.

मुख्यमंत्री हे फार महत्त्वाचे पद

देवेंद्र फडणवीस म्हणाले, सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संदर्भात नारायण राणे यांनी जे काही वक्तव्य केलं त्यातून एक वाद उभा राहिला. मला असं वाटतं की, बोलण्याच्या भरात नारायण राणे तसं बोलले असतील. तसं बोलण्याचं त्यांच्या मनात असेल असं मला वाटत नाही. मुख्यमंत्री हे पद फार महत्त्वाचं आहे. त्या पदाबद्दल बोलत असताना संयम बाळगणे महत्त्वाचे आहे.

त्या वक्तव्याचं समर्थन नाही पण…

महाराष्ट्राचे मुख्मयंत्री स्वतंत्र्याचा अमृतमहोत्सव विसरतात याुळे कोणाच्या मनात संताप निर्माण होऊ शकतो. त्याचा वेगळ्या प्रकारे निषेध केला जाऊ शकतो हे सांगत असताना त्यावर सरकार ज्या पद्धतीने कारवाई करत आहे त्याचं बिलकूल समर्थन केलं जाऊ शकत नाही. एक गोष्ट अतिशय स्पष्टपणे सांगतो की, भाजप राणे साहेबांच्या त्या वक्तव्याच्या पाठिशी नाही पण भाजप पूर्णपणे नारायण राणेंच्या पाठिशी आहे.

error: Content is protected !!