शनि शिंगणापूर कोविड सेंटरला गंगापूरच्या शनि भक्ताकडून मदत

0 103

गंगापूर, सचिन कुरुंद – शनिशिंगणापूर येथे मंत्री शंकरराव गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली देवस्थान ट्रस्ट आयोजित कोविड सेंट्रलला औरंगाबाद जिल्ह्यातील गंगापूर येथील शनिभक्त सिद्धार्थ भरत गांधी यांनी पाच बेड रुग्णासाठी भेट दिली.

जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख यांच्या हस्ते ही मदत स्वीकारून कोविड सेंटर ला प्रदान करण्यात आली. कोरोना सारख्या महाभयंकर रोग्याशी सामना करण्यासाठी गोरगरिबांना किमान निवासाची व साधनसामग्रीची कमतरता भासू नये म्हणून या दानशूर गांधी यांनी सढळ हाताने मदत केली. या उपक्रमाचे कौतुक केलं जातं आहे.

या प्रसंगी जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागाचे सभापती सुनील गडाख,देवस्थानचे विश्वस्त पोपटराव शेटे,आप्पासाहेब शेटे,युवक कार्यकर्ते उदय पालवे,संजय भळगट, रुग्णालयाचे मेडिकल व्यवस्थापक अजित शेटे,अनिल आगळे,आदी उपस्थित होते.

गांधी यांनी समाज सेवा म्हणून कठीण काळात समाजासाठी काहीतरी देणे लागतो म्हणून या भावनेने गांधी यांचे आभार मानले.कोरोना लढासाठी एक वर्षांपासून नागरिक हैराण झाले आहे त्या साठी कोणत्याही प्रकारची मदत करण्याचे आवाहन पशुसंवर्धन सभापती सुनील गडाख यांनी केले आहे.

error: Content is protected !!