सेलूत शटर बंद, हॉटेल सुरू

0 548

सेलू, पंकज सोनी – सध्या परभणी जिल्ह्यात लॉकडाऊन आहे. जिल्हाभरात याची कडक अंमलबजावणी होत असताना सेलूत मात्र चोरी छोपे अनेक व्यवसाय सुरू असल्याचे दिसते. बर्‍याच ठिकाणच्या हॉटेलसुध्दा भल्या पहाटे सुरू होताना दिसत आहेत. त्यामुळे शटर बंद असले तरी हॉटेल सुरूच अशी परिस्थिती आहे. परंतु याकडे पोलीस व नगरपालिका प्रशासनाकडून जाणूनबुजून दुर्लक्ष होत असल्याचे दिसते.

pune lok1

सेलू नगरपालिकेजवळ असणार्‍या काही हॉटेल सुरू आहेत. विशेष म्हणजे हे पोलिस व नगरपालिका प्रशासन यांना माहित असूनही यावर कारवाई केली जात आहे. येथील काही हॉटेल या शटर बाहेरून बंद करून आतमध्ये बिनधास्तपणे सुरू आहेत. केवळ हाकेच्या अंतरावर नगरपालिकेचे कार्यालय असतानाही काहीच माहिती नसल्यासारखे अधिकारी, कर्मचार्‍यांचे वर्तन आहे. पोलीस प्रशासनाची वाहने ज्यावेळेस येतात, त्यावेळेस ते सायरन वाजवत येतात. त्यामुळे असे वाटते जणू काही ते व्यावसायिकांना इशारा देत आहेत की, आम्ही आलो आहोत शटर बंद करा. नगरपालिकेजवळील व वालूर रोडवरील हॉटेल चालकांना लॉकडाऊनमधून सुट देण्यात आली आहे की काय? असा प्रश्‍न सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे. कारण शहरातील दुसरे एखादे दुकान उघडे दिसले तर त्यावर तात्काळ कारवाई करून दंड आकारला जात आहे. परंतु या हॉटेल चालकांना सुट का दिली जात आहे असा प्रश्‍न उपस्थित होतो.

error: Content is protected !!