सोळंकेमुळे माजलगांव पुरवठा विभागातील भ्रष्टाचार उघड, निलंबित दुकानाला एक वार्षांपासुन रेशन वाटप

0 155

माजलगांव, प्रतिनिधी :- येथील पुरवठा विभागात झालेला मोठा भ्रष्टाचार विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्न रुपात आ . प्रकाश सोळंके यांनी उपस्थित केला होता . माजलगांवच्या पुरवठा विभागातमागील अनेक वर्षाप सून भ्रष्टाचार होत असल्याचे अनेक तक्रारी असून रेशन दुकानदार व पुरवठा विभागाचे तहसीलदार यांचे मोठे साटेलोटे ऐकण्यास मिळतात . पुरवठा विभागच मिळावा यासाठी मूळ माजलगांवचा अधिकारी नेहमीच बड्या व्यवहारात ही या श्यामसुंदरचे कृष्ण कृत्य कारणीभूत असण्याचा संशय आहे .

आ.प्रकाश सोळंके यांनी विधानसभेत उपस्थित केलेला तारांकीत प्रश्न क्रं .३४७ ९ बाबत तहसिल कार्यायल माजलगांव येथील प्रत्यक्ष अभिलेखाची तपासणी जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी केली त्यांनी अधिकाऱ्यांना पैसे मोजत असल्याची ही चर्चा असून २-४ महिने इतर विभागात गेला की हा परत पुरवठा विभागात आपल्या ‘ श्यामसुंदर ‘ कला वापरून येतो.या दिलेल्या अहवालात तालुक्यातील एकुण १७८ स्वस्तधान्य दुकान असून सन २०१८ पुर्वीचे नुतनीकरणाचे २३ प्रस्ताव या कार्यालयास प्राप्त झाले होते त्यापैकी १२ मुळ प्राधिकारपत्र सादर केलेले नव्हते व ११ रास्त भाव दुकानदार यांनी दंडाची रक्कम भरली नसल्याने सर्व अपुर्ण प्रस्ताव तहसिलदार माजलगांव यांना विना नुतनिकरण परत करण्यात आले होते मात्र या दुकाना ना ही दर महिन्यास रेशन वाटप करण्यात आले आहे.

माजलगांव तालुक्यातील एकुण १७८ स्वस्त धान्य दुकानापैकी ३१ स्वस्तधान्य दुकान इतर स्वस्तधान्य दुकानास राजीनामा , मयत , रद्य तसेच इतर कारणासत्वइतर दुकानांना संलग्न केल्याचे म्हटले आहे . तारांकीत प्रश्न क्र .३४७ ९ चे अनुषंगाने माहिती दिली आहे या महितीच्या आधारे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी या गैरव्यवहार प्रकरणी येथील तहसीलदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असून आ सोळके यांनी केलेली तक्रार खरी आहे असे लेखी स्वरूपात सांगीतले असल्याने येथील तहसिलदार सह पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी अडचणीत आले आहेत .

अहवालात भ्रष्ट कर्मचाऱ्यांची पाठराखण ?
हा गैरव्यवहार झाला असल्याचे जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी एकीकडे आपल्या अहवालात मान्य केले असून अहवालाच्या शेवटी अधिकारी व कर्मचाऱ्यांची पाठराखण केली आहे.रेशन वाटपाबाबत जनतेच्या काही तक्रारी आल्या नसून पात्र लाभार्थ्यांना धान्य वाटप झाले असल्याचे अहवालात सांगून अहवालाची हवाच काढून घेतली आहे .

निवडणूक वर्षभर होती का ?
माजलगांवच्या तहसीलदार यांना कारणे दाखवा नोटीस बजावली असता , मी निवडणूक कामात व्यस्त असल्याने माझ्या कडून हा प्रकार झाल्याचा खुलासा तहसीलदार यांनी केला असल्यामुळे तहसीलदार व कर्मचऱ्याना वेळ मिळाला नसल्याचे ही जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी आहवालात सांगून भ्रष्ट अधिकारी वर्गास वाचवण्यासाठी प्रयत्न झाल्याचे दिसत असल्या मुळे या अहवालास ही संशयाची किनार आहे.निवडणूक २१-४०दिवसात पार पडली असून निलंबित दुकानाना १ वर्षांपासून रेशन दिल्या जात आहे हे अहवालात दुर्लक्षित केल्याचे दिसत आहे .

न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल

स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?

 

error: Content is protected !!