राष्ट्रीय लोक अदालतीत 5 कोटी 93 लाखांची वसुली

0 61

परभणी :- दि. 9 मे
जिल्हा विधी सेवा प्राधिकरण परभणी यांच्या वतीने दिनांक 7 मे 2022 रोजी परभणी जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये एकूण 13073 प्रकरणे निकाली निघाली असून यामध्ये पाच कोटी 93 लाख 63 हजार 164 एवढ्या पैशांची वसुली करण्यात आली आहे.

न्यायालयातील प्रलंबित तडजोड पात्र प्रकरणाचा तपशील खालील प्रमाणे
1. न्यायालयातील प्रलंबित प्रकरणे – 469 – रुपये 41524513 वसुली
2. स्पेशल ड्राईव्ह – 284 प्रकरणे निकाली
3. ग्रामपंचायत पाणी पट्टी व घरपट्टी – 7661 प्रकरणे – रुपये 15863151 वसुली
4. ई- ट्रॅफिक चालन – 4659 प्रकरणे – रुपये 1975500 वसुली
याप्रमाणे राष्ट्रीय लोकदल मातीमध्ये एकूण 13073 प्रकरणे निकाली निघाली असून यामधून रुपये 59363164 एवढी वसुली करण्यात आली आहे.सदरची राष्ट्रीय लोक अदालत यशस्वी करण्याकरिता जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे अध्यक्ष तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस एम शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एफ के शेख, पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, पॅनल प्रमुख, पॅनल विधिज्ञ यांनी महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडली.

या प्रकरणावर झाली राष्ट्रीय लोक अदालत

सर्व प्रकारची तडजोड पात्र फौजदारी प्रकरणे, ग्रामपंचायतीची घरपट्टी व पाणी पट्टी प्रकरणे, भारतीय चलनक्षम दस्तऐवज अधिनियम 1881, बँकेतील प्रकरणे, मोटार अपघातांची प्रकरणे, कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भु- संपादन प्रकरणे, वीज प्रकरणे, पाणी व आकार प्रकरणे, वेतन व भत्ते यांची सेवा विषयक प्रकरणे, महसूल आणि दिवाणी स्वरूपाची प्रकरणे अशी अनेक प्रकरणे निकाली काढण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन द्वारे राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते.राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष ॲड गोपाल दोडिया, जिल्हा पुरोगामी वकील संघाचे ॲड बीटी पोळ, जिल्हा सरकारी वकील ॲड डी यु दराडे यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.

error: Content is protected !!