माजलगाव शहरात खळबळ :“त्या” कोरोना अहवाल निगेटीव्ह आलेल्यांचे काही वेळातच उडाले होश…

0 272

माजलगांव, प्रतिनिधी – माजलगाव येथील देशपांडे हॉस्पिटलमध्ये उपचार घेतलेल्या रूग्णाचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आल्यानंतर हे रूग्णालय सील करून येथील डॉक्टरांसह इतर कर्मचार्‍यांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्या सर्वांचा आज दि. 11 जून रोजी अहवाल प्राप्त झाला असून सर्व अहवाल निगेटीव्ह आले आहेत. याचा आनंदोत्सव साजरा करत असताना सर्वांनीच कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने डॉक्टर देशपांडेसह इतरांवर गुन्हे दाखल करण्यात आले. त्यामुळे या सर्वांचे पोलीस प्रशासनाच्या कारवाईने काही वेळातच होश उडाले.

माजलगाव येथील देशपांडे हॉस्पिटलमध्ये 2 जुन ते 4 जून या कालावधीमध्ये धारुर तालुक्यातील आंबेवडगाव येथील 65 वर्षाचा एक वयोवृद्ध रूग्ण आजारी असल्याने उपचार घेत होता. या उपचारा दरम्यान त्याला कोरोनाची लागण असल्याचा अहवाल 5 जुनला आला होता. रुग्ण मुंबईहून आंबेवडगाव या मुळगावी आल्याचे समजले होते. त्यामुळे देशपांडे हॉस्पिटल डॉक्टरसह सर्व कर्मचारी स्टाफ व हॉस्पिटल आरोग्य विभागाने सील केले आले होते. परंतु 11जुन गुरुवार रोजी त्या विलगीकरण करण्यात आलेल्या सर्वांचे अहवाल नेगिटिव्ह आले. ही निश्‍चितच आनंदाची व समाधानाची बाब आहे. परंतु याचा विलक्षण आनंद साजरा करण्यासाठी देशपांडे हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. जी.आर.देशपांडेसह सर्व कर्मचार्यांनी हॉस्पिटलच्या बाहेर आनंद उत्सव साजरा केला आहे. हे करताना जमावबंदी, सामाजिक अंतर चे उल्लघंन करून विनापरवाना बँडबाजाच्या धुंदीत नाचगाणे करुन जल्लोष केला आहे.

कोणतेही नियम न पाळता अनेक लोक एकत्र करून जमवुन डॉक्टर देशपांडे सह इतर ताल धरून तर काही ताल सोडुन नाचले. याचे फोटो व व्हिडीओ व्हायरल झाले होते आणि त्याची दखल पोलीस प्रशासनाने घेतली असुन प्रकरणात संबंधीतांवर गुन्हे दाखल करण्यासाठी पोनि. सुरेश बुधवंत यांनी कर्तव्य दक्षता घेऊन भादंवि. कलम 188, 269 आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51(ब) सह कलम 17 तसेच महाराष्ट्र पोलिस कायदा 1951चे कलम 135 अन्वये गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये डॉ. गजानन देशपांडे, त्यांचा मुलगा डॉ.श्रेयस देशपांडे, स्टाफमधील चेतन मिसाळ, अजय जाधव, प्रशांत भिसे, राहूल टाकणखार, अशोक घोडके, चेतन कुंदे, बालाजी क्षीरसागर यांच्यासह बॅन्जो पथकातील इतर अशा एकूण 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याने माजलगाव शहरात एकच खळबळ उडाली आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवराचे पाणी का गुलाबी झाले ? वाचा लोणार सरोवरातील पाणी गुलाबी होण्यामागे शास्त्रीय कारण

संत ज्ञानेश्वर महाराज प्रस्थान सोहळ्यास जास्तीत जास्त ५० लोकांना प्रवेश : जिल्हाधिकारी नवल किशोर राम



error: Content is protected !!