भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्याची तालुका कार्यकारिणी

0 218

माजलगांव,प्रतिनिधी:-तालुक्यातील भ्रष्टाचार ला आळा घालण्यासाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश महाराष्ट्र राज्य संघठने पाऊल उचलले आहे भ्रष्टाचाराला कुठेतरी आळा बसावा म्हणून वाल्मिक निवास येथे भ्रष्टाचार निर्मुलन करण्यासाठी या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या आदेशाने बीड जिल्हा अध्यक्ष भाऊसाहेब घोडके तर महिला बीड जिल्हा अध्यक्ष रुक्मिणी ताई गिरी यांच्या उपस्थितीत माजलगांव तालुक्यात कार्येकार्णी ची निवड करण्यात आली आहे.

 

महाराष्ट्र सह बीड जिल्ह्यात भ्रष्टाचार बोकला असल्याने या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी महाराष्ट्रात भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश या संघटनेने पाऊल उचलले आहे. होणाऱ्या भ्रष्टाचाराला कुठे तरी आळा बसायला पाहिजे म्हणून भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश संघटनेत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून महिलाचा ही पुढाकार आदिक दिसत असून या संघटनेच्या महिला तालुका अध्यक्ष पदी सौ. दुर्गा रासवे, पुरुष पैकी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश तालुका अध्यक्ष रमेश रासवे, शिक्षक कर्मचारी सेल बीड जिल्हा अध्यक्ष पदी कल्याण सावध यांची नियुक्ती करण्यात आली तर शिक्षक सेल च्या माजलागांव तालुका अध्यक्ष पदी विष्णू झोंबाडे, सचिव जी व्ही सोनवणे,रघुनाथ माने,किरण राऊत,सुदर्शन लोखंडे,पृथ्वीराज निर्मल,अर्जुन धिसले,विश्वस क्षीरसागर यांची निवड दि. ५जुलै रोजी करण्यात आली या निवडी बद्दल उमेश जेथलिया,भास्कर गिरी, मधुकर सरवदे आदी सह यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.

महावितरणच्या भरतीचा परीक्षार्थींना Shock : भाग-१

 

error: Content is protected !!