कारवाईची मागणी : तहसीलदार म्हणतात , ‘ कारवाया चालूच आहेत ‘ मुरूम , वाळूचा अवैध उपसा

0 198

माजलगांव, प्रतिनिधी:- तालुक्यात चार महिन्यांत कोरोनाच्या काळात वाळू विक्री व उपसा हा कायदेशिररीत्या बंद असल्यामुळे चोरट्या वाळू उपसा चार महिन्यांपासून चालू आहे . सिंदफणा व गोदाकाठ परिसरातून वाळू तस्कारांनी पिंजून काढला आहे . ठिकठिकाणी वाळूचे साठे करून ठेवले आहेत तर धरण परिसरातील पाणअभावी उघडा पडलेला मुरूम हा कमी उपसा करण्याची परवानगी असतानाही जास्तीचा उपसा करण्यात येत आहे .

यामध्ये महसूल विभागासह पोलिसांचे दुर्लक्ष असून , संबंधितांवर जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ कारवाई करून हा अवैध उपसा थांबवावा , अशी मागणी नागरिकांतून होत आहे . माजलगांव तालुक्यात चाललेला वाळू व मुरूम उपसा महसूल विभाग व पोलिसांच्या आशीर्वादाने चालला असल्याचा आरोप होत आहे . यामध्ये शासनालाा करोडो रूपयांच्या चुना लावण्याचे काम येथील अधिकारी करत आहेत .

माजलगांव तालुक्यातील डुब्या , काळेगावथडी , आबेगाव , बोरगाव , सादोळा , पुरुषोत्तमपुरी , हिवरा , मंजरथ , मोगरा या गावासह अनेक नदीकाठच्या गावातून चोरटी वाळू वाहतुक मोठ्या प्रमाणात होत असून , यामध्ये पोलीस व महसूल विभागाचे कर्मचारी संगनमत करत असल्याचा आरोप या भागातील गावकरी व शहरातील नागरिक करत आहेत . माजलगांव धरण क्षेत्रामध्ये उघड्या पडलेल्या मुरुमासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना अनेकांनी निवेदन देऊनही त्यांनी देखील याची दखल घेतली नाही .

माजलगांव धरणातून चार महिन्यांमध्ये केवळ ५० ते ६० ब्रास मुरुम उचलण्याची परवानगी घेऊन हजारो ब्रास मुरुम ठराविक लोकांना हाताशी धरून हे उद्योग सुरु असून , प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर उत्खनन होत असून , यामध्ये मोठ्या प्रमाणात शासनाला चुना लावत आपले खिशे भरण्याचे काम महसूल व पोलीस प्रशासनाकडून होत आहे . याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तात्काळ चौकशी करून संबंधितांकडून दंड वसूल करून कायदेशीर कारवाईची मागणी आहे .

“दररोज महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांकडून कारवाया करण्यात येत असून , मोठ्या प्रमाणावर महसूल विभागाने महसूल जमा केला आहे .

– डॉ . प्रतीभा गोरे , तहसीलदार , माजलगांव.

स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?

न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल

 

error: Content is protected !!