शेतकऱ्याची अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्राचे लायसन रद्द करा – भाई ॲड नारायण गोले पाटील

0 205

माजलगांंव, प्रतिनिधी :- तालुक्यातील शेतकरी सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पिकांना खत घालण्याची घाई करत आहेत परंतु माजलगांंव येथील काही कृषी केंद्र शेतकऱ्यांना युरिया खत चढ्या भावाने विक्री करत आहेत तर काही कृषी केंद्र युरिया खता सोबत दुसरा खत घेण्याचे सक्तीचे करत आहेत शिवाय काही कृषी केंद्राकडे युरिया खत उपलब्ध असूनही शेतकऱ्यांना युरिया खत उपलब्ध नसल्याचे सांगून शेतकऱ्यांची अडवणूक करत आहेत, ही बाब गंभीर असून सध्या देशावर कोरोना चे संकट असताना बळीराजा स्वतःच्या जीवाची पर्वा न करता अन्नधान्य, भाजीपाला, दूध इत्यादी जीवनावश्यक वस्तू आपल्याला पुरवण्याचे काम करत असताना, कृषी केंद्र शेतकऱ्यांची अडवणूक करून कोरोनाच्या संकटाचा फायदा घेऊन आपला खिसा भरण्याचे काम करत आहेत.

परंतु काही अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून संबंधित कृषी केंद्रांना पाठीशी घालण्याचे काम करत आहेत ही बाब शेतकरी कामगार पक्ष माजलगांंव कदापिही खपून घेणार नाही म्हणून शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई ॲड. नारायण गोलेपाटील यांनी काही कृषी केंद्रांना प्रत्यक्षभेट देऊन शेतकऱ्यांना सहकार्य करण्याची विनंती केली परंतु कृषी केंद्राचे संचालक ऐकायला तयार नाहीत, म्हणून कृषी अधिकारी कार्यालय माजलगांंव येथे जाऊन कृषी अधिकारी श्री संगेकर यांची भेट घेतली.व संबंधित कृषी केंद्रा चे लायसन रद्द करण्याबाबत तक्रार केली असून लवकरचं शेतकऱ्यांची अडवणूक करणाऱ्या कृषी केंद्राचे लायसन रद्द करण्यात येईल असे कृषी अधिकारी श्री संगेकर यांनी शेतकरी कामगार पक्षाचे नेते भाई अॅड. नारायण गोलेपाटील यांना आश्वासित केले यापुढे संबंधितावर कार्यवाही न झाल्यास शेतकरी कामगार पक्ष आक्रमकपणे हा लढा लढणार असल्याचे भाई ॲड नारायण गोले पाटील यांनी सांगितले.

स्वतःच्या नातेवाईकासाठी वनामकृविच्या कुलगुरूंनी केले बैठकीचे आयोजन?

न्यायालयात वाढदिवस साजरा, ११ वकीलांवर गुन्हा दाखल

 

error: Content is protected !!