शहराच्या प्रवेशद्वारालाच कचऱ्याचे ढिगारे माजलगांव येथील स्थिती : नागरिकांचे आरोग्य धोक्यात

0 136

माजलगांव, (प्रतिनिधी):- शहराच्या प्रवेशद्वारासह ठिकठिकाणी कचन्याचे ढिगारे साचले असून , या घाणीच्या साम्राज्यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आले आहे . घनकचरा युनिट कार्यान्वित नसल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत . येथील नगरपालिका राज्यभरामध्ये कोटयवधी रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात गाजत असताना शहरवासीय कचऱ्याच्या दुर्गधीने जीव मुठीत धरून वावरत आहेत .

शहराच्या लोकसंख्येचा विस्तार वाढताच आहे . जिल्ह्यात माजलगांवची बाजारपेठ मोठी आहे . त्यामुळे या बाजारपेठेतील कचरा , घरातील ओला , सुका कचरा रस्त्यावर फेकला जात असल्याने कचऱ्याचे प्रमाणही वाढतच आहे . त्यावर उपाय म्हणून पालिका प्रशासनाने घन कचरा युनिट केसापुरी कॅम्प या ठिकाणी उभारले , परंतु या युनिटचा पालिकेस विसर पडल्याने कचरा गोळा करणारी घंटागाडी , दुकानातील कचरा , सडलेला भाजीपाला , फळे आदी कचरा टाकण्यासाठी सिंदफणा नदीपात्राशेजारच्या जागेचा वापर करीत आहेत . त्यामुळे माजलगांव शहराच्या प्रवेशद्वारावरच घाणीचे साम्राज्य पसरले असून , नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे .

“मी नव्यानेच नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला आहे . लवकरच स्वच्छता मोहीम राबवून सिंदफणा नदीपात्रा.शेजारचा परिसर स्वच्छ केला जाईल . नागरिकांनी घंटागाडीतच कचरा टाकून सहकार्य करावे . -सुमन मुंडे , नगराध्यक्षा , माजलगांव

नाक दाबूनच शहरात प्रवेश
सिंदफणा नदीपुलाजवळ आल्यावर शहरात प्रवेश करताना दुर्गंधीयुक्त घाण वासाचा सामना करावा लागतो . नाक दाबूनच पुढे जावे लागते . कचऱ्याच्या ठिकाणी मोकाट कुत्र्यांचा वावर असल्याने अपघातही झालेले आहेत . नदीपुलाजवळ टाकलेल्या मटन दुकानातील कचऱ्यासह विविध ओला , सुका कचरा जास्त वाढल्यास या कचऱ्याला जाळले जाते . त्यामुळे या भागात नेहमीच प्रदूषण होते . श्वास घेण्यासही त्रास होतो.

गंगाखेड शहरातील योगेश्‍वर कॉलनी, आंबेडकर नगर, ओम नगर, तिवट गल्ली व सेलूतील पारीख कॉलनी प्रतिबंधित क्षेत्र

 

error: Content is protected !!