कोरोना रूग्णांत वाढ, नवीन 9 कंटेनमेंट झोनची परभणी जिल्ह्यात भर
परभणी, प्रतिनिधी – परभणी जिल्ह्यात 9 विविध भागांत कोरोना बाधित रूग्ण आढळून आल्याने प्रतिबंधित क्षेत्रांत वाढ झाली आहे.
परभणी शहरातील दर्गा रोडवरील गालीब नगर, वर्मा नगर, नवा मोंढा, गढीवान मोहल्ला-शाही मस्जिद, गंगाखेड शहरातील फुले नगर, वाघमारे गल्ली, शेटे गल्ली, गंगाखेड तालुक्यातील मौ. कातकरवाडी, मानवत शहरातील रंगार गल्ली, पाथरी तालुक्यातील मौजे देवनांद्रा ग्रामपंचयात हद्दीतील जवाहन नगर या भागांत कोरोना बाधित रूग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे सदरील परिसर शासनाच्या नियमानूसार प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत.
आता मिळणार होम क्वारंटाईनला परवानगी,पण….
गुगलच्या मदतीने वेब पोर्टलने घेतली गगन भरारी