आरटीओ परवाना धारक खाजगी वाहन चालकांना कोरोनाचा फटका .?

0 107

मालक घरात असल्याने ,पगार बंद ? ओळखपत्र पाहूण मोफत धान्य, देण्याची भाजपा प्रवक्ता राम कुलकर्णी यांची मागणी

माजलगांव, प्रतिनिधी :- कोरोनाच्या संकटामुळे चार महिन्या पासून राज्यातील खाजगी वाहन चालक, मालक घरात बसल्याने, कामावर नाही , त्यामुळे त्यांच्या संसारावर नांगर फिरल्यागत असून कुठूंबीयाची उपासमार होत आहे , आशा लोकांचा विचार राज्य सरकारने करावा , ज्यांच्या कडे आरटीओ परवाना आहे .तो ग्राहय धरुन त्यांना मोफत रॅशन देण्याची मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे .

प्रवक्ता राम कुलकर्णी यांनी यासंदर्भात काढलेल्या पत्रकात म्हटले आहे की .देशात आणि राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाउन झाल्यानंतर. राज्यातील खाजगी वाहन चालक एका जागेवर बसून आहेत .कारण त्यांच्या मालक, आणि गाड्या बंगल्यात, लागल्याने या लोकांना कामावर जाता येत नाही. दुसरी गोष्ट त्यांना पगार नाही. त्यामुळे वर्तमान परिस्थितीत बाहेर काम नाही. आणि घरात उपास मार सुरु आहे .

फार मोठ आर्थिक संकट वाहन चालकावर आल असून. राज्यात लाखो वाहनचालक ,अर्थात ड्रायव्हर आर्थिक संकटात सापडले आहेत. खरंतर या वाहनचालकांना राज्य सरकारने आर्थिक मदत द्यायला हवी? सरकारच्या प्रादेशिक परिवहन मंडळाकडे अर्थात, आरटीओ कडे ज्यांची रजिस्टर नोंदणी आहे.? असे ड्रायव्हर राज्यात दहा लाखापेक्षा अधिक आहेत. विशेष म्हणजे खाजगी मालक त्यांना घरी बसून पगार द्यायला तयार नाहीत?

आणि कामावर त्यांना येऊ देत नाहीत. एकूणच त्यांच्या संसारावर नांगर फिरल्यासारखे सध्या झाले असून उपासमार होत आहे. या वर्गातील लोकांना राज्य सरकारने स्वस्त धान्य वितरण व्यवस्थेमार्फत जो, धान्य वितरण केल जात. मोफत यांना दयावे त्यासाठी लाभार्थी कार्ड,र्रेशन कार्ड , किंवा केसरी कार्ड, याची आट घालता कामा नये . आरटीओ परवाना ज्यांच्याकडे आहे? तोच ग्राह्य धरावा. आणि त्यांना महिन्याकाठी ,गहू तांदूळ तुरदाळ, मोफत द्यावी .अशा प्रकारची मागणी भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केली आहे .

जर त्यांना अशी मदत मिळाली. तर फार मोठा दिलासा मिळेल .असेही त्यांनी या पत्रकात म्हटल आहे .राज्याचे अन्नपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या मागणीचा विचार करून, तशा प्रकारचे आदेश जिल्हा पुरवठा विभागाला तात्काळ द्यावेत ,असे त्यांनी या पत्रकात म्हटले आहे .

परभणी जिल्ह्यातील पहिलाच आमदार कोरोना पॉझिटिव, स्वतः आमदारांनी फेसबुक पेज वरून केले जाहीर

error: Content is protected !!