गिरवी ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती साजरी

0 86

फलटण – तालुक्यातील गिरवी येथील ग्रामपंचायत कार्यालयात महात्मा गांधी जयंती सरपंच शरद मदने, कृषी अधिकारी लालासो निंबाळकर, केंद्रप्रमुख अनिल कदम, ग्रामसेवक सागर सांळुखे, जिल्हा परिषद शाळा गुरदराचे मुख्याध्यापक शिवाजी बोडरे, जिल्ह परिषद शाळा हरारीमळा शाळेतील उपक्रमशील शिक्षक सुनिल जाधव यांचे प्रमुख उपस्थितीत महामा गांधी जयंती साजरी करण्यात आली.

याप्रसंगी कृषी अधिकारी लालासो निंबाळकर यांनी महात्मा गांधी यांचे प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. पूजन सरपंच शरद मदने यांनी केले यावेळी स्वागत व प्रास्ताविक ग्रामसेवक सागर सांळुखे यांनी केले. आभार प्रदर्शन शिवाजी बोडरे यानी मानले. सुगसंचलन सुनिल जाधव यांनी केले याप्रसंगी केंद्रप्रमुख अनिल करम यांनी मार्गदर्शन केले. या कार्यक्रमास आशावर्कर, आरोग्य सेविका, ग्रामपंचायत सदस्य, पदाधिकारी व . अधिकारी होते.

error: Content is protected !!