तीर्थक्षेत्र आळंदी आणि परिसरात साध्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा
आळंदी, प्रतिनिधी – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात आलेला श्री हनुमान जन्मोत्सव तीर्थक्षेत्र आळंदी आणि परिसरात साध्या पद्धतीने व घराघरात श्री हनुमान चालीसा वाचून साजरी करण्यात आली, व कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी सर्वांना शक्ती मिळो, अशी श्री हनुमान चरणी प्रार्थना करण्यात आली, देशात सर्वत्र कोराेनाने हाहाकार उडाला असून महाराष्ट्रातही मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण सापडत आहेत, त्यामुळे सर्वत्र लॉकडाऊनआहे, आळंदी व परिसरातही लॉक डाऊन मुळे सर्व बंद आहे, अशा काळात हनुमान जन्मोत्सव आल्याने येथे दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात गर्दी करून व विविध कार्यक्रम घेऊन हनुमान जन्मोत्सव साजरा न करता आळंदी आणि परिसरात प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करून मोजक्याच लोकांच्या उपस्थित साजरा करण्यात आला.
अनेकांनी आप आपल्या घरातच राहून श्री हनुमान चालीसाचे वाचन करत श्री हनुमान जन्मोत्सव साजरा केला व श्री हनुमान चरणी,कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी आम्हाला शक्ती मिळू दे ।अशी मनोमन प्रार्थना करण्यात आली, सूर्यदया च्या वेळेस हनुमान जन्मोत्सव प्रथा व परंपरेने परंतु गर्दी न करता मोजक्या लोकांच्या उपस्थितीत संत ज्ञानेश्वर महाराज मंदिर येथील हनुमान जन्मोत्सव साजरा आला यावेळी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती.
ग्रामदैवत हजेरी मारुती मंदिराला आंब्याच्या पानाचे तोरण व पुष्पहार माळा लावण्यात आल्या होत्या, यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई व दरवर्षाप्रमाणे मोठी सजावट करण्यात आली, साध्या पद्धतीने मंदिरात हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला, श्री हनुमान जन्मोत्सव निमित्त हजेरी मारुती मंदिरात गर्दी न करता साध्या पद्धतीने जन्मोत्सव साजरा करण्यात दरवर्षाप्रमाणे मोठ्या उत्साहात व विविध कार्यक्रम यावर्षी लॉकडाऊनमुळे करण्यात आले नाहीत असे माजी नगराध्यक्ष राहुल चिताळकर पा. यांनी सांगितले. काळा मारुती, शनि मारूती, कुर्हाडे तालीम, घुंडरे तालीम, गोपाळपुर येथील मारुती मंदिर येथे साध्या पद्धतीने हनुमान जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच आळंदी परिसरातील वडगाव घेनंद, केळगाव, मरकळ, चर्होली खुर्द, धानोरे, सोळूगाव अशा प्रत्येक गावात साध्या पद्धतीने श्री हनुमान जन्मोत्सव यावर्षी साजरा करण्यात आली.