घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन,मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानचा उपक्रम

0 63

 

परभणी,दि 30 (प्रतिनिधी) :- गौरीपूजन हा महिलांचा आवडता सण आहे. त्यानिमित्ताने रात्रभर जागून महिला आपल्या घरातील गौरीची सजावट करतात. वेगवेगळ्या वस्तुंचा वापर करून आर्कषक असा देखावा निर्माण केला जातो. त्यात महिलांचे कला कौशल्य दिसून येते. त्यामुळे नाविन्यपूर्ण सजावट करणा-या महिलांच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यासाठी मातोश्री दगडूबाई गुट्टे प्रतिष्ठानने यंदा गंगाखेड विधानसभेतील युवती व महिलांसाठी भव्य अशा घरगुती गौरी सजावट स्पर्धेचे आयोजन केले आहे. त्यामध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील गौरी सजावटीचा केवळ एक मिनीटाचा व्हिडीओ चित्रिकरण करून दिनांक ५ सप्टेंबर रोजी रात्री ८ वाजेपर्यत गंगाखेड (८२०८४८०८४६), पालम (९८८१८६७००९), पूर्णा (९८८१७७२४९५) या
व्हाटसप क्रमांकावर पाठवून द्यायचा आहे. या स्पर्धेतील विजेत्यांसाठी भरपूर अशी बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये प्रथम क्रमांक ११,००० रूपयांची पैठणी आणि सन्मानचिन्ह, द्वितीय क्रमांक ७,००० रूपयांची पैठणी आणि सन्मानचिन्ह, तृतीय क्रमांक ५,००० रूपयांची पैठणी आणि सन्मानचिन्ह, चतुर्थ क्रमांक २,००० रूपयांची पैठणी आणि सन्मानचिन्ह, पंचम क्रमांक २,००० रूपयांची पैठणी व सन्मानचिन्ह असे बक्षिसांचे स्वरूप आहे. गंगाखेड, पालम आणि पूर्णा या तीन तालुक्यांसाठी शहरी व ग्रामीण अशा दोन्ही विभागात स्वतंत्र बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. त्यासाठी दोन्ही विभागातीन तब्बल ३० विजेत्या महिलांना बक्षिसे दिली जाणार आहेत. स्पर्धेचे पारितोषिक वितरण मराठी सेलिब्रेटींच्या उपस्थित संपन्न होणार आहे. त्यामुळे गंगाखेड विधानसभेतील जास्तीत-जास्त युवती व महिलांनी स्पर्धेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्रतिष्ठानचे सचिव अॅड.मिलिंद क्षिरसागर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी प्रभाकर सातपुते ९९२१२३७५८५ किंवा ९८८१७७२४९५ या क्रमांकावर संपर्क साधावा. स्पर्धेचे आयोजनात आ.डाॅ.रत्नाकर गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिष्ठानचे अध्यक्ष हनुमंत मुंढे, उपाध्यक्ष शिवाजी पवार, बाबा पोले, हनुमंत लटपटे, कवी विठ्ठल सातपुते, संभुदेव मुंढे, सचिन महाजन, राजेभाऊ सातपुते यांनी पुढाकार घेतला आहे.

error: Content is protected !!