काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक- महाराष्ट्रातील बड्या नेत्याचं नाव चर्चेत

0 581

नवी दिल्ली : काँग्रेसमध्ये अध्यक्षपदासाठी निवडणूक  होतेय. ही निवडणूक 17 ऑक्टोबरला होणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी नावं चर्चेत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरूर हे देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. त्याबाबत शशी थरूर गांभिर्याने विचार करत असल्याची माहिती आहे. मात्र अद्याप त्यांनी आपला अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. ते काही नेत्यांशी आणि आप्तस्वकियांशी संवाद साधत आहेत. लवकरच ते याबाबत निर्णय जाहीर करण्याची शक्यता आहे. तसंच इतकरही काही नावं चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील एक मोठं नाव चर्चेत असल्याची माहिती आहे.

 

थरूर लढण्याची शक्यता

काँग्रेस अध्यक्षपदासाठी मोठी नावं चर्चेत आहेत. काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि तिरुअनंतपूरमचे खासदार शशी थरूर हे देखील काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. काही दिवसांआधी त्यांनी काँग्रेसमधील अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर मल्याळम दैनिक ‘मातृभूमी’साठी एक लेखही लिहिला होता. यामध्ये त्यांनी मुक्त आणि निष्पक्ष निवडणूक व्हावी अशी इच्छा व्यक्त केली होती.

 

महाराष्ट्रातील मोठं नाव चर्चेत

काँग्रेससाठी गांधी घराण्याबाहेरील अध्यक्ष देण्यावर राहुल गांधी ठाम आहेत. यासाठी शशी थरूर यांच्यासह मनीष तिवारी आणि पृथ्वीराज चव्हाण यांचीही नावं चर्चेत आहेत. काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात हे दोन बडे नेतेही उतरण्याची शक्यता आहे.

काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकी 17 ऑक्टोबरला ही निवडणूक होणार आहे. चा निकाल 19 ऑक्टोबरला जाहीर होणार आहे. 22 सप्टेंबर रोजी निवडणुकीची अधिसूचना जारी होणार आहे. 24 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या कालावधीत अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्यात येणार आहेत. काँग्रेस अध्यक्षपदासाठी होणारी ही खुली निवडणूक आहे. कोणीही त्यात भाग घेऊ शकतो. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधींना अध्यक्षपदी राहण्याचं आवाहन केलं. पण राहुल गांधी त्यासाठी तयार नाहीत. अनेक नेत्यांनी सांगितलं की राहुल गांधींनीच अध्यक्षपद स्वीकारावं, पण राहुल गांधी आपल्या निर्णयावर यावर ठाम आहेत, निवडणुकीच्या तारखांची घोषणा करताना काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी ही माहिती दिलीय.

error: Content is protected !!