थकबाकीसाठी सेलूत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दालनास नगरपालीकेने ठोकलं सील

0 26

सेलू ( नारायण पाटील )
९४ लाख रुपयांच्या थकबाकी पोटी आज नगर परिषदेकडून कृषी उत्पन्न बाजार समिती च्या दालनास सील ठोकण्यात आले . आज मंगळवारी दुपारी साडेचार वाजता करण्यात आलेल्या कार्यवाहीच्या वेळी उपमुख्याधिकारी भगवान चव्हाण ,प्रशासकीय अधिकारी उ बा चाऊस ,करअधीक्षक नितीन इजाते ,करनिरीक्षक मुस्तजाब खान ,कार्यालयीन अधीक्षक मलिकार्जुन स्वामी यांची उपस्थिती होती . नोव्हेंबर पासून वारंवार या थकबाकी साठी पाठपुरावा करण्यात आला होता परंतु बाजार समिती प्रशासनाकडून कसलाच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे केवळ नाईलाजास्तव ही सिल ठोकण्याची कार्यवाही करण्यात आल्याची माहिती कार्यवाही वेळी उपस्थित अधिकाऱ्यांनी दिली.
तहसील कार्यालय, पाठबांधारे विभाग, महावितरण ,दूरसंचार विभाग आदी विभागाकडे देखील नगर परिषदेची प्रचंड थकबाकी आहे .सर्व विभागाकडे या थकबाकी बाबत न प कडून पाठपुरावा चालू आहे .
नगर परिषदेला स्व उत्पन्न वाढविण्याचे स्पष्ट निर्देश राज्य शासनाकडून प्राप्त झाले आहेत.
तसेच १५ वा वित्त आयोग, सहायक अनुदान इत्यादी शासनाकडून प्राप्त होणारी विविध अनुदाने देखील नगर पालिकेच्या आर्थिक उत्पन्नाचे अवलोकन करून च उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या नगर पालिकेला दिल्या जात असल्याने नगर परिषदेला आर्थिक उत्पन्न वाढविल्या खेरीज दुसरा पर्यायच उरला नसून थकबाकी वसुली हा त्यासाठी एकमेव उपाय नसल्याचे मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री देविदास जाधव यांनी सांगितले आहे. सेलू शहरातील सर्वच मालमत्ताधारक व पाणी पट्टी धारक थकबाकीदारांनी आपल्याकडील थकबाकी ३१ मार्च आगोदर भरणा करून नगर पालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

कारण वसुली हाच नगर परिषदेचा कणा असून तोच जर खिळखिळा झाला तर नगर परिषदेची एकंदर सर्वच आर्थिक परिस्थिती डबघाईला येऊन विकासात्मक कामाला खीळ बसते .यासाठी मूलभूत गरजा मिळवणे हा जरी नागरिकांचा हक्क असला तरी यासाठी आपल्याकडील मालमत्ता कराचा व पाणी पट्टीची बाकी वेळेवर भरणा करणे हे त्यांचे कर्तव्य आहे .तरच नगरपरिषदेचा गाडा व्यवस्थित चालू शकतो .

error: Content is protected !!