आमदारकीसाठी पक्ष सोडणारे ‘ते’ निष्ठावंत होते का?

निष्ठावंत की गरजवंत हे ओळखण्याची गरज?

0 8

 

 

 

गत काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकीची चर्चा प्रत्येक जिल्ह्यात / मतदारसंघात होती,यादरम्यान काही भाजपाच्या इच्छुकांनी वरिष्ठ नेत्यांच्या भेटीगाठीसाठी चंग बांधला होता. पण भाजपाकडून पदांचा व विकासकामांचा लाभ घेऊन आता उमेदवारी मिळत नाही हे लक्षात आल्यानंतर काही निष्ठावंत असल्याचा आव आणणारे ते सर्व नेते/पदाधिकारी भाजपा सोडून इतर पक्षात पळून जात आहेत. तर काही नेतेमंडळी ९९ उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपा पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. पक्षाने आता निष्ठावंत कोण? आणि गरजवंत कोण? हे ओळखले पाहिजे.

 

राज्याच्या प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येकाला वाटते जिल्हाध्यक्ष झालोय आता आमदारकी सहज मिळवू शकतो,पण जिल्हाध्यक्षांनी निवडणूक जिंकण्यापेक्षा मलाच कशी उमेदवारी मिळेल हा चंग बांधला होता,याचे उदाहरण पाहिले तर इंदापूर विधानसभाप्रमुख मा.आ.हर्षवर्धन पाटील,देगलूर विधानसभा प्रमुख मा.आ.सुभाष साबणे,सिंधुदुर्ग विधानसभा प्रमुख मा.आ.राजन तेली व बीड जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन वेगळी भूमिका घेतली. असे अनेक नेते पक्ष सोडत आले आहेत व आगामी काळात सोडतीलही,तरी पक्षश्रेष्ठींनी सामान्य कार्यकर्त्याची दखल घेत प्रत्येक मोर्चा/प्रकोष्ठ/आघाडी यातील प्रदेश/विभाग प्रमुख पदाधिकाऱ्यांना मतदारसंघ वाटून देत भाजपा व महायुती उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष नियोजन केले पाहिजे. उमेदवारी अर्ज दाखल होईपर्यंत अजून किती पक्ष सोडून पळून जातील सांगता येत नाही. पण उमेदवारी दाखल झाल्यानंतर मतदारसंघात कार्यकर्त्यांचे खरे काम असणार आहे! त्यामुळे आमदारकीसाठी पक्ष सोडणारे निष्ठावंत होते का? असा प्रश्न निष्ठावंत भाजपा कार्यकर्त्यांत चर्चिला जातो आहे…

error: Content is protected !!