मानोली शिवारात ढगफुटी,महिला गेली वाहुन

0 2,644

परभणी,दि 10 ः
मानवत तालुक्यातील मानोली शिवारात सोमवारी दि. १० रोजी दुपारी चारच्या सुमारास ढगफुटी झाली.याच वेळी शेतातून घरी निघालेल्या दोन महिला शिवारातून वाहत असलेल्या ओढ्याच्या पुरात अडकल्या.यात सुनिता धुरपती लव्हाळे( वय ४०) ही पुरात वाहून गेली तर रंजना भास्करराव सुरवसे यांनी झाडाला धरुन ठेवल्याने त्या सापडल्या आहेत.परंतु त्यांची शुध्द हरपली आहे  बेशुद्ध अवस्थेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, दरम्यान, सुनिता धुरपती लव्हाळे या महिलेचा रात्री उशीरापर्यंत शोध सुरु होता.दरम्याण जिल्ह्यात मानवत, सेलु या भागात सोमवारी जोरदार पाऊस झाला.

error: Content is protected !!