शक्तीपीठ महामार्ग रद्द करा अन्यथा आंदोलन…स्वाभिमानीचा इशारा

0 261

परभणी,दि 12 ः
महाराष्ट्र शासनाने प्रस्तावित असलेला शक्ती पीठ महामार्ग जात आहे तो रद्द करण्यात यावा. अन्यथा तिव्र आंदोलन करु असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे.याबाबत मंगळवारी (दिनांक 12) जिल्हाधिकारी कार्यालय  येथे निवेदन देण्यात आले आहे.

परभणी जिल्ह्यातून जाणारा हा महामार्ग अनेक गावे उधवस्त करत जाणार आहे. ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात अल्प भूधारक शेतकरी आहेत. या महामार्गात अल्पभूधारक शेतकरी भूमिहीन होणार आहे. हा महामार्ग जर अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मधोमध गेल्यास दोन्ही बाजूला उरलेली थोडी थोडी जमीन कसायाची कशी…? बरेच पाण्याचे स्त्रोत अडवले जाणार. महामार्ग जात असलेला परभणी जिल्ह्यातील बराच भाग बागायती असल्यामुळे सुपीक आणि चांगल्या उत्पादन क्षमता असलेल्या जमिनी यात जात आहेत. भविष्यात वाढत्या लोकसंख्येची अन्नधान्याची गरज भागवणे अवघड होईल. दुसरीकडे परभणी जिल्ह्यात कोणतेच ऊद्योग धंदे नाहीत शेती शिवाय या जिल्ह्यात दुसरा उद्योग नाही. अश्या परिस्थितीत या महामार्गामुळे अनेक शेतकरी देशोधडीला लागणार आहेत. त्याच बरोबर जिल्ह्यातून शक्ती पिठास जाण्याचे अनेक मार्ग आहेत. त्यामुळे वेगळा महामार्ग निर्माण करून शेतकऱ्याला मारून शक्ती पीठ नाव देऊन महामार्ग करण्याचा हा शासनाचा अट्टाहास कश्यासाठी…? तरी आम्हा सर्व शेतकऱ्यांची विनंती कि दि.२८/०२/२०२४ रोजी शासन निर्णय क्र.साधारण क्र.१०१ अन्वये शक्तीपीठ महामार्ग विशेष क्रमांक १० रद्द करावा हि विनंती. जर हा महामार्ग रद्द नाही केला तर स्वाभिमानी शेतकरी संघटना परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा किशोर ढगे, रामप्रसाद गमे, मुंजाभाऊ लोडे, गजानन तुरे, माऊली शिंदे, प्रसाद गरुड, रमेश नामदेव गरुड, गजानन पांडुरंग गरुड , रामभाऊ साहेबराव दामोदर, शिवराज शेटे, अंकुश संभाजी गरुड, पांडुरंग रुस्तुमराव गरुड, नारायण शंकर गरुड, रामराव अवचार, नामदेव रुस्तुम आवचार, सुंदर तुकाराम वाघ, श्रीरंग सोपान वाघ, शिवाजी बनसोडे , कुंताबाई बनसोडे, विश्वनाथ नारायण बनसोडे, विजय नागोराव बेले, सावित्र विजय बेले , नागोराव अप्पाराव बेले, भागीरथी नागोराव बेले, गंगाधर शेट्टे, गजानन दामोधर यांनी दिला आहे

error: Content is protected !!