सुदीक्षा फाउंडेशनच्या वतीने वृद्धाश्रमात नित्योपयोगी वस्तूंची भेट

0 23

परभणी,दि 12ः
सुदीक्षा फाउंडेशन यांच्या वतीने रविवार दिनांक १० मार्च,२०२४ रोजी मा. अनिता अगरवाल, यांच्या हस्ते त्यांचे वडील स्व. श्री. सुरेंद्रकुमार जैन यांचे स्मरणार्थ सुर्योदय वृद्धाश्रम, धायरी, पुणे येथील आजी आजोबांना नित्योपयोगी वस्तूंची भेट देण्यात आली. यात टेबल्स, स्टूल्स, जेवणासाठी भांडी सेट, पंखे या वस्तूंचा समावेश आहे. याचबरोबर फळेही खाऊ म्हणून देण्यात आली.
या प्रसंगी सुदीक्षा फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा सौ उमा गोपाळे विश्वनाथन यांनी सर्व कार्यक्रमाचे आयोजन केले होते.या प्रसंगी स्टाल कुकवेअरचे अनिता व ध्रुव आगरवाल तसेच अनिता यांची सून आणि सर्व नातवंडेही उपस्थित होती.

error: Content is protected !!