लक्ष्मीनगर वाळू डेपोवरील अवैध वाळू उपशावर कारवाई

घटनास्थळी गावठी कट्टा सापडल्याची चर्चा

0 318

पूर्ण प्रतिनिधी, केदार पाथरकर – मागील काही दिवसापासून राज्य सरकारच्या वतीने मागील त्याला वाळू हे धोरण राबविण्यात येत होते परंतु या धोरणाला संबंधित यंत्रणा आणि वाळूमाफिया यांनी हरताळ फासत चक्क अवैधरित्या वाळू उपसा मोठ्या प्रमाणात करून स्वतः चे चांगभले करण्याचा प्रकार तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील वाळू डेपो परिसरात सुरू होता.

 

याची माहिती पूर्णा येथील महसूल पथकाला मिळताच मंगळवारी रात्री तहसीलदार, नायब तहसीलदार यांच्या पथकाने थेट पूर्णा नदीच्या पात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करून विक्रीसाठी घेऊन जाणार्‍यांविरोधात कारवाई करून सात वाहने ताब्यात घेतली. या वाहनांना तब्बल तेरा लाख रुपयाचा दंड आकारण्यात आला आहे. पहिल्यांदाच एवढी मोठी कारवाई केल्यामुळे अवैध रेती उपसा करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत.

 

याबाबत अधिक माहिती अशी की पूर्णा तालुक्यातील लक्ष्मी नगर येथे मागील काही दिवसापासून शासकीय हमीभावाने तालुक्यातील गोरगरीब जनतेला वाळू मिळावी यासाठी वाळू डेपो तयार करण्यात आला आहे. हा वाळू डेपो तयार करण्यासाठी जिल्हा प्रशासन महसूल प्रशासनाने नियमावली घालून दिलेल्या संबंधित ठेकेदाराला वाळू साठा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु हा वाळूसाठा परवानगी असताना याचा फायदा परिसरात संबंधित वाळू डेपो चालकाने घेतला व त्यांनी त्या वाळू साठ्याच्या परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू केला आहे. याबद्दल अनेक रेती तस्करांनी आपले बस्तान थाटले असून दिनांक 9 फेब्रुवारी या घटनेची माहिती तहसीलदार माधव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या पथकाला मिळताच सायंकाळी सात वाजता नायब तहसीलदार प्रशांत थारकर, तहसीलदार माधव बोथिकर, तलाठी मोरे, गोरे सातपुते, सह महसूलच्या पथकाने थेट लक्ष्मी नगर येथे जाऊन पूर्णा नदीच्या पात्रामध्ये छापा टाकला. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असल्याचे निदर्शनास आले. सूर्यास्तानंतर वाळू उपशाला परवानगी नसताना या ठिकाणी जेसीबीद्वारे मोठ्या प्रमाणात वाळू उपसा करून ते खुल्या बाजारामध्ये विक्रीसाठी घेऊन जाणारी सात वाहने महसूलच्या पथकाने घटनास्थळी ताब्यात घेतली. यामध्ये गाडी नंबर एम एच सत्तावीस बी एक्स 7135, गाडी नंबर एम एच 22 ये ये 911, एम एच 22 ए 0011, एम एच 22 एन 1555, एमएच 36 1827, एम एच झिरो चार डिके झिरो 00266 या सात वाहनांमध्ये अवैध रेती उपसा दिसून आले. त्या सात वाहनांमधील जवळपास घटनास्थळावर पंचनामा करून 14 ब्रास वाळू महसूलच्या पथकाने जप्त करून ही सर्व वाहने पूर्ण येथील तहसील कार्यालयामध्ये ताब्यात घेऊन लावण्यात आली आहे. दरम्यान दिनांक 10 रोजी या सर्व वाहनांना जवळपास 13 लाख रुपयाचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी दिली.

 

 

घटनास्थळी गावठी कट्टा सापडल्याची चर्चा
लक्ष्मी नगर येथील वाळू साठ्यावर दिनांक 9 फेब्रुवारी रोजी माझ्या वाहनांमध्ये वाळू भरू दे या कारणावरून त्या ठिकाणी वाळू तस्करांमध्ये बाचाबाची होऊन घटनास्थळावर एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याची चर्चा आहे. त्यासोबतच एकाने बाचाबाची करून चक्क थेट गावठी कट्टा उगारल्यामुळे घटनास्थळी गोळीबार झाल्याची अफवा तालुक्यामध्ये पसरली होती. दरम्यान हा गावठी कट्टा कोणाकडे होता, कोणावर उगारला होता याची अजूनही चर्चा दबक्या आवाजात सुरू असून यासंदर्भात दिनांक 10 फेब्रुवारी पर्यंत पूर्ण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला नव्हता.

error: Content is protected !!