अरुणाचल प्रदेशात अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कमाल 

0 16

विधानसभेची मुदत संपत असल्याने अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम विधानसभा निवडणुकीची मतमोजणी रविवारीच पार पडली. अरुणाचल प्रदेशात विधानसभेच्या एकूण 60 जागा आहेत. यामध्ये भाजपने तब्बल 41 जागा जिंकत घवघवीत यश मिळवले. अन्य पाच जागांवर भाजपचे उमेदवार आघाडीवर असल्याने विजयी जागांचा हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
अरूणाचल प्रदेशमध्ये गेल्या महिन्यात 19 एप्रिलला विधानसभेच्या 60 जागांसाठी मतदान पार पडलं होतं. यानंतर आज मतमोजणी सुरु आहे. निवडणुकीच्या निकालाचे आकडे आता समोर येत आहेत. या निकालानुसार, अजित पवारांच्या राष्ट्रवादीची अरूणाचल प्रदेशमध्ये एन्ट्री झाली आहे. अरूणाचल प्रदेशमध्ये विधानसभेत अजित पवारांचे 3 उमेदवार विजयी झाले आहेत. टोको तातूंग, लिखा सोनी आणि निख कमिन हे उमेदवार विजयी झाले आहेत. अजित पवार गटाकडून एकूण 15 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते. 2 उमेदवारांचा थोडक्यात पराभव झालाय. तर 3 उमेदवार जिंकून आले आहेत

अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची कमाल

अरुणाचल प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एकूण 15 उमेदवार उभे होते. यापैकी तीन जण निवडून आले आहेत. तर एक उमेदवार दोन मतांनी पडला आहे. दुसरा उमेदवार 200 मतांनी पडला आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत भाजप सर्वात मोठा पक्ष. 46 आमदार जिंकत भाजपने विधानसभेतील आपली सत्ता राखली.

अरुणाचल प्रदेशात राष्ट्रवादी काँग्रेसने मिळवली 10 टक्के मतं

राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष प्रुफल पटेल यांनी अरुणाचल प्रदेशातील विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. अरुणाचल प्रदेश विधानसभेत राष्ट्रवादी काँग्रेसने तीन जागा जिंकल्या असून पक्षाला एकूण 10 टक्के मतं पडली आहेत. राष्ट्रीय पक्ष होण्याच्यादृष्टीने हा विजय राष्ट्रवादी काँग्रेससाठी अत्यंत महत्त्वाचा असल्याचे प्रफुल पटेल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

अरुणाचल प्रदेश विधानसभेचा निकाल

विधानसभेतील एकूण जागांची संख्या – 60

भाजप – 46
नॅशनल पीपल्स पार्टी – 5
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – 3
पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल – 2
काँग्रेस – 1
अपक्ष – 3

error: Content is protected !!