..अन बाळासाहेबांनी मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा… राज ठाकरे यांनी सांगितला ‘तो’ किस्सा

पहा व्हिडिओ

1 179

मुंबई – शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आज(२३ जानेवारी) जयंती आहे. बाळासाहेबांच्या जयंतीचं औचित्य साधून मनसेने आपल्या ट्विटर हँडलवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत राज ठाकरे यांनी शिवसेना सोडतानाच्या शिवसेनाप्रमुखांसोबतच्या भेटीचा किस्सा सांगितला आहे. सध्या हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे.

 

मनसे अधिकृत या ट्विटर हँडलवरुन एक व्हिडिओ ट्विट करण्यात आला आहे. तर, व्हिडिओसोबत राजसाहेबांचा वंदनीय बाळासाहेबांसोबत अखेरचा ‘राज’कीय संवाद, असं कॅप्शन दिलं आहे. राज ठाकरे पक्ष सोडताना बाळासाहेबांच्या भेटीसाठी गेले होते. तेव्हा त्याच्यात झालेलं संभाषण राज ठाकरे यांनी एका सभेत सांगितलं होतं. त्याच सभेतील एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मनसेनं ट्विट केली आहे.

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून ट्वीट करण्यात आलेल्या व्हीडिओमध्ये राज ठाकरे म्हणताना दिसतात की, “मला आजही ती गोष्ट आठवते की जेव्हा बाळासाहेबांना कळलं, की हा काही राहत नाही पक्षात आता. माझी शेवटची भेट होती. मी आपर्यंत कधी बोललो नाही तुम्हाला ही गोष्ट पण निघताना माझ्याबरोबर तेव्हा मनोहर जोशी होते, मनोहर जोशी रूमच्या बाहेर गेले आणि ते रूमच्या बाहेर गेल्यावर मला बाळासाहेबांनी बोलावलं, माझ्यासमोर हात पसरले आणि मला मिठी मारली आणि म्हणाले आता जा. त्यांना समजलं होतं.”

 

याचबरोबर, “जेव्हा मुलाखतकाराने मला विचारलं की भुजबळांचं बंड, नारायण राणेंचं बंड, शिंदेंचं बंडं आणि तुमचं बंड म्हटलं माझं बंड लावू नका त्यात. हे सगळेजण गेले हे एका पक्षात गेले आणि सत्तेत गेले. या तुमच्या राज ठाकरेने बाळासाहेब ठाकरे यांना भेटून त्यांना सांगून मी बाहेर पडलेलो आहे. त्यामुळे मी दगाफटका करून, गद्दारी करून, पाठीत खंजीर खुपसून असा नाही बाहेर पडलेलो आणि बाहेर पडून दुसऱ्या कुठल्याही पक्षात गेलो नाही. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला.” असंही राज ठाकरे म्हणले आहेत.”

 

error: Content is protected !!