बीडच्या शेकाप संघाने पटकावला नितीन चषक,  मालेगावचा संघ ठरला उपविजेता

0 70

सेलू(नारायण पाटील)

नितीन व्यायाम शाळा कला, क्रीडा व सांस्कृतिक युवक मंडळ, सेलू द्वारा हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीदिना निमीत्त आयोजित राज्यस्तरीय निमंत्रितांच्या स्व. नितीन लहाने स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा  दि १५ ते २३ जानेवारी या दरम्यान पार पडल्या.नूतन महाविद्यालयाच्या भव्य क्रीडांगणावर आज या स्पर्धेचा अंतिम सामना झाला. या सामन्यात शेकाप बीड 68 धावांनी स्व.नितीन चषकावर दावेदार ठरला.

 

बक्षीस वितरण समारंभात आचार्य प.पू.गुरुदेव श्री ओम रामेश्वरजी महाराज, म्हणाले की या स्पर्धेतून देशपातळीवर खेळणारे अनेक खेळाडू निर्माण व्हावे तसेच देशाच्या प्रती खेळाडुंनी खिलाडी वृत्तीचे योगदान असावे. हे मैदान तयार करणारे सर्व स्वंयसेवक, प्रेक्षकांना शुभेच्छा दिल्या.

२५ व्या होणाऱ्या ”  नितीन चषक” क्रिकेट स्पर्धेस शिवालयाच्या वतीने विशेष योगदान देण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी  दिले.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभासाठी  विशेष उपस्थितीत  म्हणून आंतरराष्ट्रीय आध्यात्मीक मार्गदर्शक मठाधिपती परम श्रेद्धेय दिव्यज्ञानी आचार्य प.पू.गुरुदेव श्री ओम रामेश्वर महाराज, पुणे, हे होते .तर कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी मा.आ. हरीभाऊ  लहाने (अध्यक्ष नितीन क्रीडा मंडळ सेलूप्रमुख पाहुणे:- हेमंतराव आडळकर (अध्यक्ष, साईबाचा नाग. सह. बँक) मोहन अग्रवाल प्रमुख, शिवसेना, जालना)डॉ. संजय रोडगे (संचालक. कृ. उ.बा. स. सेलू). नामदेव  डख (संचालक, कृ. उ.बा. स. सलू) संदिप  लहाने (सचिव तथा मा. उपनगराध्यक्ष, सेलू)उदय बोराडे (शिवसेना तालुकाप्रमुख मंठा)अजय डासाळकर, परमेश्वर आकात, एकनाथ वाटे आदींची प्रमुख उपस्थिती होती .

 

अध्यक्षीय समारोप  हरीभाऊ लहाने यांनी केला.. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाचे सचिव संदीप भैय्या लहाने, तर सुञसंचलन मोहन बोराडे, आभार प्रदर्शन राजेश राठोड यांनी मानले‌सकाळी ११ वाजता   बीड   संघाने नाणेफेक  जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला .यावेळी  बीड संघाने 20 षटकात 7 गडी बाद 185धावा केल्या .यामध्ये  धर्मेश पटेल 43,आर्शद खान 40,आमान शेख 33 यांचे महत्वाचे योगदान ठरले.

मालेगाव च्या वतीने गोलंदाजी करताना शुमिल याने 3 गडी तर ईशांत राय व विकास पवार यांनी 1-1 गडी बाद केले.

मालेगाव संघाने 185 धावांचा पाठलाग करताना 15 षटकात 117/10 गडी बाद झाले.यात

इम्रान गेल 18, ,असिफ खान19, खलिल जमान 11, ईशांत राय 28 धावांचे योगदान दिले.

बीड च्या  शेख सिद्दीकी  याने भेदक व आक्रमक गोलंदाजी करून  ५ गडी तंबूत पाठवले, तर धर्मेश पटेल  याने 2 गडी बाद केले .  व  बीड संघानेब ६८ धावांनी स्व.नितिन चषक पटकावला.

सामनावीर पुरस्कार शेकाप बीडच्या शेख सादेक  यास देण्यात आला . प्रथम पुरस्कार : शेकाप बीड संघास १ लाख रुपये रोख पारितोषिक आ. मेघना दिदी बोर्डीकर यांच्या वतीने तर चषक नामदेव आप्पा डख यांच्या वतीने देण्यात आले.

व्दितीय पारितोषिक मालेगाव संघास 71 हजार पंकज आंबेगावकर (कृ.उ.बा.स. सभापती)

मालिका वीर मालेगाव च्या इम्रान गेल 240 धावा व ३गडी बाद  केले . मालिका विराचा पुरस्कार २१ हजार रोख व चषक पारस काला यांच्या वतीने ३ देण्यात आला . या स्पर्धेत पंच म्हणून  सय्यद जमशेद, गंगाधर शेवाळे यांनी तर गुणलेखक:सलमान सिद्दीकी,प्रमोद गायकवाड यांनी काम पाहिले . समालोचक म्हणून शेख यासेर, विजय वाघ,पवन फुलमाळी,मोईन शेख, वैभव सरकटे, यांनी  काम केले.

स्पर्धा यशस्वीतेसाठी संयोजक गणेश माळवे, प्रा. नागेश कान्हेकर,संदीप लहाने,राजेश राठोड,अभी चव्हाण,मसूद अन्सारी,प्रमोद गायकवाड, गजानन शेलार,दीपक निवळकर,झिशान सिद्दीकी,मोईन शेख,मोसीन सय्यद,अजय काष्टे, मंगेश गाडगे,सुरज शिंदे, वैभव सरकटे, माझ अन्सारी, श्रीशैल्य फटाले,आदित्य आडळकर,बंटी सोळंके,नाविद शेख, फाजील बागवाण,कफील बागवान,कपिल ठाकूर,सोनाजी पौळ,आलीम पठाण,श्लोक लिंगे यांनी केले.

error: Content is protected !!