लाचखोर ग्रामविकास अधिकारी मधुकर गोरे जाळ्यात…

0 329

परभणी,दि 05 ः
पोहंडूळ येथे डी.पी.डी.सी. च्या निधी मधून मंजूर झालेल्या रकमेतून तेथील नाली व सिमेंट रोड तयार करण्याचे काम केलेले होते.त्यासाठी 10 हजाराची लाच घेताना ग्रामविकास अधिकारी  मधुकर गोरे याला एसीबीने रंगेहाथ पकडले आहे.

यातील तक्रारदार यांनी मौजे पोहंडूळ येथे डी.पी.डी.सी. च्या निधी मधून मंजूर झालेल्या रकमेतून तेथील नाली व सिमेंट रोड तयार करण्याचे काम केलेले होते.

 

दिनांक 06/05/2024 रोजी तक्रारदार यांनी वरील प्रमाणे केलेल्या कामाचे धनादेश मिळविण्यासाठी आरोपी लोकसेवक मधुकर गोरे, ग्रामविकास अधिकारी, पोहंडूळ यांची भेट घेवून धनादेश घेतला. त्यानंतर सदर धनादेश तक्रारदार यांचे बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या RTGS फॉर्मवर आलोसे मधुकर गोरे यांची सही व शिक्का आवश्यक असल्याने सदरचे सही व शिक्का देण्यासाठी आलोसे मधुकर गोरे यांनी तक्रारदार यांना 20,000/- रुपये लाच मागितली. सदर लाचेची रक्कम न दिल्यास आलोसे मधुकर गोरे हे RTGS फॉर्मवर सही व शिक्का देणार नाही या भितीने तक्रारदार यांनी त्यांच्या कडे असलेले 4,000/- रूपये आलोसे मधुकर गोरे यांना लागलीच दिले. त्यानंतर उर्वरित 16,000/- रूपये RTGS फॉर्म वर सही व शिक्का घ्यायचे वेळी आणून देण्यास सांगितले. सदर रक्कम ही लाच असल्याने व तक्रारदार यांना लाच द्यायची इच्छा नसल्याने त्यांनी दिनांक 13/05/2024 रोजी एसीबी परभणी कार्यालयात तक्रार दिली.

 

दि.13/05/2024 रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान तक्रारदार यांना मिळालेला धनादेश त्यांचे बँक खात्यात जमा करण्यासाठी आवश्यक असलेल्या RTGS फॉर्मवर आलोसे मधुकर गोरे यांनी सही व शिक्का देण्यासाठी तडजोडी अंती 10,000/- रूपये लाचमागणी केल्याचे निष्पन्न झाले.
त्यावरून दि.05/06/2024 रोजी पंचासमक्ष करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान आलोसे गोरे यांनी तक्रारदार यांचेकडून 10,000/- रुपये लाच रक्कम स्विकारली आहे. त्यावेळी आलोसे मधुकर गोरे यांना लाचेच्या रकमेसह लागलीच ताब्यात घेण्यात आले आहे. या संबंधाने पो.स्टे.मानवत येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे .
➡ मार्गदर्शक –
डॉ.राजकुमार शिंदे,
पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, नांदेड परिक्षेत्र,नांदेड
मोबाईल क्र. 9623999944
➡ पर्यवेक्षण अधिकारी
श्री.अशोक इप्पर,
पोलीस उप अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, परभणी
मोबाईल क्र.9850483337
➡ सापळा व तपास अधिकारी –
श्री.सदानंद वाघमारे,
पोलीस निरीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो,परभणी
➡ सापळा कारवाई पथक –
टीम अँटी करप्शन ब्युरो, परभणी
————————————–
परभणी जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, त्यांच्याकडे कोणत्याही शासकीय अधिकारी/कर्मचारी यांनी किंवा त्यांच्या वतीने खाजगी इसम (एजेंट) यांनी कोणतेही शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर फी व्यतिरिक्त अन्य लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ खालील दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

दुरध्वनी क्रमांक
02452-220597
टोल फ्रि क्रं. 1064

error: Content is protected !!