ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या कामगिरीविषयी थोडक्यात…

0 36

ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले (footballer pele) यांना फुटबॉल जगताचा अनभिषिक्त सम्राट (emperor of the football world) मानलं जात होतं. त्यांना अगदी फुटबॉलचा देवही म्हटलं जायचं. ते फुटबॉल कारकिर्दीत फॉरवर्ड म्हणून खेळत असंत, त्यांना सर्वकालिन महान फुटबॉलपटू असंही म्हटलं जातं. फिफानेही पेले यांना महान खेळाडूचं लेबल दिलं होतं. ते त्यांच्या काळातील सर्वात यशस्वी फुटबॉलपटू मानले जात होते. कारण त्यांनी एक-दोन नाही तर तीन वेळा विश्वचषक जिंकवून दिला होता. त्यांच्यामुळेच ब्राझील हा सर्वात यशस्वी फुटबॉल संघ म्हणून जगासमोर आला. आपल्या कारकिर्दीत क्लब, आंतरराष्ट्रीय फुटबॉल अशा सर्वात मिळून पेले यांनी जवळपास 1282 गोल मारले होते.

 

फुटबॉल विश्वातील सार्वकालिक महानतम खेळाडू अशी पेले यांची ओळख आज नव्या सहस्रकातही कायम आहे. पन्नासच्या दशकापासून ७०च्या दशकापर्यंत पेले फुटबॉल विश्वातील सर्वात लोकप्रिय आणि सर्वाधिक मानधन घेणारे खेळाडू होते. तीन विश्वचषक विजेत्या (१९५८, १९६२ आणि १९७०) संघांत त्यांचा सहभाग होता. चाहत्यांच्या मनांवर त्यांनी अधिराज्य केले.

 

पेले यांच्या खेळाचे वैशिष्ट्य काय ?
ब्राझीलकडून आंतरराष्ट्रीय पदार्पण केल्यावर १९५८च्या विश्वचषक स्पर्धेपासून पेलेंचे नाव फुटबॉल विश्वात झळकू लागले. इतर खेळाडूंच्या चालींचा अंदाज घेऊन, चेंडूवर अचूक नियंत्रण ठेवत अचूक किक मारण्याची त्यांची क्षमता आजही अनेकांसाठी प्रेरक ठरते. चेंडू पायात खेळवून प्रतिस्पर्धी संघाच्या गोलकक्षात धडकून गोल करणे ही पेलेंच्या वैयक्तिक गोलची खासियत. त्यातही गोलकक्षात कॉर्नरवरून किंवा बाजूने हवेतून पास आल्यावर स्वतःला जागा करून घेत ‘बायसिकल किक’ने गोल करणे ही जणू पेलेंची ओळख झाली. आजही ‘बायसिकल किक’ने गोल झाला की पहिली आठवण पेलेंचीच येते.

 

निवृत्तीनंतर…
१९९४ साली पेले यांची UNESCOने Goodwill Ambassador म्हणून नियुक्ती केली होती. १९९५ साली ब्राझीलच्या अध्यक्षांनी त्यांची क्रीडा मंत्रालयात विशेष पद तयार केले. त्यांच्या कार्यकाळात पेले यांनी देशातील फुटबॉलमधील भ्रष्टाचार कमी करण्यासाठीचा कायदा प्रस्तावित केला होता. हा कायदा पेले कायदा म्हणून ओळखला जाऊ लागला. १९९८ साली अध्यक्षांनी हे पद निलंबित केले.

 

सलग २ वर्ष १००हून अधिक गोल
पेले यांनी १९५९ या एका वर्षात १२७ तर १९६१ साली ११० गोल केले होते. अशी कामगिरी करणारे ते जगातील एकमेव फुटबॉलपटू आहेत. त्यांच्याशिवाय झांबियाचा फुटबॉलपटू गॉडफ्रे चितालूने १९७२ साली क्लब आणि देशाकडून खेळताना १०७ गोल केले. पण पेले यांनी १०० गोलचा आकडा सलग दोन वेळा पार केला.

-अर्जेंटिनाचे फुटबॉलपटू डिएगो मॅराडोनासह पेले यांना २००० साली फिफा प्लेअर ऑफ द सेंच्यूरी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.

-वर्ल्डपकमध्ये सर्वाधिक असिस्ट (१०) करण्याचा विक्रम देखील पेले यांच्या नावावर आहे.

 

ब्राझीलला ३ वेळा वर्ल्डकप जिंकून दिला
पेले यांनी ब्राझीलला ३ वेळा विश्वविजेतपद मिळवून दिले होते. १९५८ साली सुदानविरुद्ध अंतिम सामन्यात त्यांनी २ गोल केले होते. व्यवसाइक करिअरमध्ये पेले यांनी १ हजार ३६३ सामने खेळले आणि १ हजार २८१ गोल केले. तर ब्राझीलसाठी ९१ सामन्यात ७७ गोल केले. पेले यांच्या इतके वर्ल्डकप आजवर अन्य कोणत्याही खेळाडूला जिंकता आले नाहीत. त्यांनी एकूण ४ वर्ल्डकप खेळले, १९७१ साली त्यांनी राष्ट्रीय संघातून निवृत्ती घेतली.

 

 

१९५८ साली पेले यांनी पहिला वर्ल्डकप जिंकले तेव्हा ते फक्त १७ वर्ष २३९ दिवसाचे होते. ५८च्या वर्ल्डकपमध्ये वेल्सविरुद्धच्या सामन्यात क्वॉर्टर फायनलमध्ये पेले यांनी स्पर्धेतील पहिला गोल केला होता. वर्ल्डकपमध्ये सर्वात कमी वयात गोल करणारे ते खेळाडू ठरले होते. १७ वर्ष २४४ दिवशी सर्वात कमी वयात वर्ल्डकपमध्ये गोल करण्याचा विक्रम त्यांनी केला होता. त्यांनी फ्रान्सविरुद्ध हॅट्रिक केली होती. १८ वर्षापेक्षा कमी वय असताना वर्ल्डकपमध्ये गोल करणारे ते एकमेव खेळाडू आहेत.

 

पेले यांनी जिंकलेली विजेतेपद
फिफा वर्ल्डपक- ३ वेळा
कॅम्पियोनाटो ब्रासीलेरो सीरी ए- ६ वेळा
कॅम्पियोनाटो पॉलिस्ता- १० वेळा
कोपा लिबर्टाडोरेस- २ वेळा
इंटरकॉटिनेंटल कप- २ वेळा
इंटरकॉटिनेंटल सुपर कप- १ वेळा
नॉर्थ अमेरिकन सॉकर लीग- १ वेळा
नॉर्थ अमेरिकन सॉकर लीग एथलेटिक कॉन्फ्रेंस- १ वेळा
विराट कोहलीने का घेतला टी-२० क्रिकेटमधून ब्रेक, समोर आलं आता खरं कारण

 

 

पेले यांनी केलेले गोल
वर्ल्डकप क्वालिफायर्स- ५१
कोपा अमेरिका- ८
इंटरनॅशनल फ्रेंडली- ६
फिफा वर्ल्डकप- १२
सॅनोस FC- ६४३
न्यूयॉर्क कॉसमोस- ६४

 

 

पेलेंचा चाहत्यांवरील प्रभावाचे उत्तम उदाहरण त्यांच्या सुरुवातीच्याच काळाचे देता येईल. सॅण्टोस विरुद्ध कोलंबियन ऑलिम्पिक संघ असा सामना १८ जून १९६८ रोजी सुरु होता, तेव्हाची गोष्ट : पंच गुईलेर्मो यांनी पेले फाऊल असल्याचा निर्णय दिला. तेव्हा त्यांची पंचांशी वादावादी झाली. पंचांशी हुज्जत घातल्यामुळे पेलेंना पंचांनी पेलेला मैदानाबाहेर काढले. तेव्हा उपस्थित प्रेक्षकांना हा निर्णय रुचला नाही. त्यांनी इतका गोंधळ घातला की शेवटी पंच गुईलेर्मो यांनी पेलेंना मैदानात बोलावले आणि आपली शिटी लाइनमनला देऊन ते स्वतः मैदानाबाहेर गेले! सॅण्टोस संघाचा १९६७ मधील नायजेरिया दौरा म्हणजे पेलेंच्या लोकप्रियतेचा कळस होता. तेव्हा नायजेरियात यादवी सुरू होती, पण पेलेंना पाहण्यासाठी चक्क ४८ तासांचा युद्धविराम जाहीर करण्यात आला होता!

error: Content is protected !!